Uttar Pradesh Assembly Election
Uttar Pradesh Assembly Election esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

उत्तर प्रदेशातील रणधुमाळी शिगेला

सकाळ वृत्तसेवा

अमेठी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या अमेठी येथून गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला. गांधी कुटुंबाने भावनिक आवाहन करत अमेठीवासीयांचा मानसिक छळ केला आणि गरीबांच्या जमीनी हडप केल्या, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भाजपने अमेठी भागात दीड हजार कोटींचे विकासकामे केली आहेत. अमेठीत भाजपने रस्ते, मेडिकल कॉलेज, शाळा, बाह्यवळण मार्गाची निर्मिती केली.

पंतप्रधान मोदी यांची आज पाचव्या टप्प्यांतील मतदारसंघासाठी सभा आयोजित करण्यात आली. अमेठी जिल्ह्यातील चार आणि सुलतानपूर जिल्ह्यातील पाच विधासभा मतदारसंघासाठी गौरीगंजच्या कौहार येथील सभेत बोलताना मोदी यांनी विरोधी पक्षाकडून घराणेशाहीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. भाजपचे डबल इंजिनचे सरकार उत्तर प्रदेशात विकासाची कामे करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या चारही टप्प्यांत मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. दहा मार्चच्या निकालातून घराणेशाही चालवणाऱ्या लोकांना आपली जागा कळून चुकेल आणि मतदार विकास कामानांच मत देतात, हे लक्षात येईल.

घराणेशाहीने नुकसान

उत्तर प्रदेशात भाजपचेच सरकार येईल, असे सर्वसामान्य नागरिक म्हणत आहेत. आम्ही जात किंवा धर्म पाहून मदत करत नाहीत. पात्र असलेल्या व्यक्तीला मदत केली जाते. गरीबांना धान्य देण्याबरोबरच घरही दिले जात असल्याचे ते म्हणाले. व्होट बँक आणि घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे नुकसान केले आहे. अशा लोकांना पुढे जाण्यापासून रोखले पाहिजे. व्होट बँकचे राजकारण हे घराणेशाही करणाऱ्या लोकांची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

महागाईवर भाजपचे मौन: यादव

प्रयागराज : देशातील वाढत्या महागाईवर भाजपचे नेते मौन बाळगून आहेत. ते काहीच बोलत नाहीत, अशी टीका आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की योगी म्हणतात आम्ही १२ वाजता झोपेतून उठतो. त्यांनी जेव्हा १२ वाजल्याची गोष्ट सांगितली, तेव्हांपासून आम्ही देखील त्यांच्या घरावर लक्ष ठेवण्यास सुरवात केली. मुख्यमंत्री या गोष्टी कोठून पाहतात, हे समजत नाही. मला देखील त्यांच्या घरातून सायंकाळी धूर येत असल्याचे दिसून येत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी पेंटर जाताना पाहिले. त्याचा तपास केला असता धुराचे डाग मिटवण्यासाठी पेंटर बोलावले आहेत, असे कळाले. तुम्हीच सांगा बाबा जी (योगी आदित्यनाथ) जात आहे की नाहीत, असा सवाल त्यांनी जनतेला केला. हंडिया येथे आयोजित सभेत बोलताना अखिलेश म्हणाले की, युवकांचे वय वाढले, परंतु सरकारने भरती सुरू केली नाही.

नेत्यांकडून जातीचे राजकारण: प्रियांका

लखनौ: उत्तर प्रदेशात राजकारण धर्म आणि जातीवर केले जात असल्याने स्थानिक नेत्यांनी विकासाऐवजी या मुद्याकडेच अधिक लक्ष दिले, अशी टीका आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. भावनिक राजकारण अधिक झाल्याने राज्याचा विकास खुंटल्याचेही त्या म्हणाल्या. गेल्या काही दशकांत उत्तर प्रदेशातील काँग्रेसची स्थिती कमकुवत राहिली असली तरी पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत असून ते पक्षांची बांधणी करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

‘पीटीआय’ ने प्रियांका गांधी यांना प्रश्‍नावली पाठवली होती. त्यास लिखित स्वरुपात त्यांनी उत्तरे दिली. प्रियांका गांधी यांनी म्हटले, की उत्तर प्रदेशचे राजकारण हे धर्म आणि जात याभोवतीच केंद्रीत राहिले आणि हे खरे आहे. अशा प्रकारच्या राजकारणामुळे नेते समाधानी राहिले, परंतु राज्य विकासापासून वंचित राहिले. उत्तर प्रदेशातील कोणताही नेता असो तो धर्म आणि जातीच्या आधारावर मत मिळतील, या विचारात असतो. त्यामुळे अन्य मुद्दे उकरून काढण्याची गरज त्याला वाटत नाही. परिणामी जनतेचे कळीचे प्रश्‍न बाजूला पडतात आणि नेतेमंडळी देखील त्याकडे लक्ष देत नाही. जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण केले जात असल्याने विकास, सुशासन आणि आर्थिक आघाडी या गोष्टी मागे पडत गेल्या. काँग्रेस पक्ष गेल्या ३३ वर्षांपासून उत्तर प्रदेशात सत्तेत येऊ शकला नाही. याबाबत त्या म्हणाल्या, की आपली संघटना उत्तर प्रदेशात कमकुवत राहिली आहे. निवडणुकीत आघाडी राहिल्याने आमचे उमेदवार २०० ते ३०० जागांवर उभा करता आले नाही.देशातील वाढत्या महागाईवर भाजपचे नेते मौन बाळगून आहेत. ते काहीच बोलत नाहीत, अशी टीका आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की योगी म्हणतात आम्ही १२ वाजता झोपेतून उठतो. त्यांनी जेव्हा १२ वाजल्याची गोष्ट सांगितली, तेव्हांपासून आम्ही देखील त्यांच्या घरावर लक्ष ठेवण्यास सुरवात केली. मुख्यमंत्री या गोष्टी कोठून पाहतात, हे समजत नाही. मला देखील त्यांच्या घरातून सायंकाळी धूर येत असल्याचे दिसून येत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी पेंटर जाताना पाहिले. त्याचा तपास केला असता धुराचे डाग मिटवण्यासाठी पेंटर बोलावले आहेत, असे कळाले. तुम्हीच सांगा बाबा जी (योगी आदित्यनाथ) जात आहे की नाहीत, असा सवाल त्यांनी जनतेला केला. हंडिया येथे आयोजित सभेत बोलताना अखिलेश म्हणाले की, युवकांचे वय वाढले, परंतु सरकारने भरती सुरू केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT