Uttar Pradesh Assembly Election 2022

Video: भरसभेत कार्यकर्त्याच्या पाया का पडले PM मोदी? वाचा कारण

सकाळ डिजिटल टीम

UP Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेतली आहे. मात्र, या सभेच्या मंचावर एक वेगळंच चित्र पहायला मिळालं. मंचावर एक भाजपचा कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीरामाची मुर्ती दिल्यानंतर त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, पंतप्रधान मोदी त्याला अडवताना दिसून आले. त्याला ते काहीतरी बजावताना दिसून आले आणि त्यानंतर त्यांनी स्वत:चं त्याच्या पायांना वाकून नमस्कार केला. यावेळी मंचावर भाषण सुरु करताना अवधी भाषेमध्ये म्हटलं की, भक्त प्रल्हादाच्या भरतीवर आम्ही सर्वांचेच पाय धरत आहोत. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी उन्नाव येथे आले होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी मोदींना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट दिली. मूर्ती दिल्यानंतर अवधेश कटियार यांनी पीएम मोदींच्या पायाला वाकून नमस्कार केला. त्यानंतर पीएम मोदींनी अवधेश कटियार यांना यासाठी मनाई केली आणि शिष्टाचार म्हणून पंतप्रधानांनी स्वतः अवधेशच्या पायाला स्पर्श केला. ते त्यांना काही बजावतानाही दिसून आले. रामाची मूर्ती भेट म्हणून देणाऱ्याने पायाला स्पर्श करू नये, असे पंतप्रधानांनी म्हटल्याचं दिसून येतंय. ृ

सपकडून दहशतवाद्यांवरील खटले मागे : मोदी

उत्तर प्रदेशात सत्तेवर असताना सपने असंख्य दहशतवाद्यांवरील खटले मागे घेतले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर त्यांनी याच संदर्भात टीका केली. चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या हरदोईतील प्रचारसभेत ते म्हणाले की, २००७ मध्ये न्यायालयाच्या आवारात स्फोट होण्याच्या घटना लखनौ आणि अयोध्या येथे घडल्या. २०१२ मध्ये सपने तारिक काझ्मी नावाच्या दहशतवाद्यावरील खटला मागे घेतला, पण न्यायालयानेच सप सरकारचा कट उधळून लावला आणि त्या दहशतवाद्याला आजन्म कारावास ठोठावला. दहशतवादी राज्यात स्फोट घडवीत असताना सप सरकारने त्यांच्याविरुद्ध खटले चालवू दिले नाहीत.

आधी पित्याचा अपमान, आता...

मोदी यांनी अखिलेश यांच्यावर पिता मुलायमसिंह यांच्यावरूनही टीका केली. ते म्हणाले की, आधी पित्याचा अपमान करून अखिलेश यांनी पक्ष काबीज केला. आता मात्र आपल्या मतदारसंघात त्यांना असुरक्षित वाटत आहे. आता पराभवापासून आपल्याला वाचवावे अशी याचना त्यांना पित्याकडे करावी लागली आहे. तुम्ही वाऱ्याच्या दिशेचा अंदाज बांधू शकता. या मंडळींना जी जागा सर्वाधिक सुरक्षित वाटत होती, तीच आता त्यांच्या हातून निसटत आहे. अखिलेश यांनी २०१७च्या निवडणुकीपूर्वी पित्याला व्यासपीठावरून बाजूला केल्याचा आरोप होते. तसे सूचित करणाऱ्या व्हिडिओचाही मोदींनी संदर्भ दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का,जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT