126 maternity done in last six months in amravati 
विदर्भ

धूळघाटात संस्थात्मक प्रसूतीत उच्चांक, दुर्गम भागात सहा महिन्यांत १२६ सुखरूप प्रसूती

सुधीर भारती

अमरावती : कोरोना महामारी असतानाही आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी निरंतर आपले कर्तव्य बजावले. जिल्ह्यातील दुर्गम भागातील धारणी तालुक्‍यातील धूळघाटरेल्वे प्राथमिक आरोग्यकेंद्राने गत सहा महिन्यांत 126 मातांची प्रसूती सुखरूप करून संस्थात्मक प्रसूतीत जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे.

अमरावतीपासून 210 किमीवर दुर्गम भागात असणारे धूळघाटरेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची लोकसंख्या 22 हजार तर ग्राम धूळघाटची लोकसंख्या दोन हजार आहे. परिसरातील गोरगरीब व आदिवासी बांधव येथील आरोग्यसेवेचा लाभ घेत असतात. एप्रिल 2020 पासून ते आजपावेतो 126 प्रसूती प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या प्रसूती कक्षामध्ये सुखरूप झालेल्या आहेत.

गत परिस्थिती पाहता जेथे किमान सात टक्‍केच प्रसूती संस्थेमध्ये होत होत्या. त्या आज 72 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचल्या आहेत. धूळघाट येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही आरोग्यसेवा कुठेही विस्कळित होऊ न देता आपले कर्तव्य बजावले. त्यातून संस्थात्मक प्रसूतीच्या प्रमाणात वाढ झाली. प्रत्येक प्रसूती झालेल्या महिलेस बाळासाठी हायपोथर्मिया किट, तीन दिवस आवश्‍यक औषधोपचार, आहार व उपस्थित कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील सदस्याप्रमाणे मनमिळावू स्वभाव या सर्व सुविधांमुळे या प्राथमिक आरोग्यकेंद्राबद्दल लाभार्थ्यांमध्ये विश्‍वास निर्माण झाला. मेळघाटातील नागरिकांनी भूमकाकडे न जाता संस्थात्मक प्रसूतीत वाढ होण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याने धूळघाटचे हे यश लक्षणीय आहे.  

प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद राठोड, डॉ. समाधान डुकरे, आरोग्यसेविका प्रमिला जावरकर, कविता धुर्वे, जीएनएम मयूरी कास्देकर, विजया भिलावेकर यांनी परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मेळघाट क्षेत्र डॉ. अभिलाष पांडे तसेच अती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक चऱ्हाटे, कविता पवार यांनी या चमूचे अभिनंदन केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT