14 lacs voters will give their vote in yavatmal district gram panchayat elections
14 lacs voters will give their vote in yavatmal district gram panchayat elections  
विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १४ लाख मतदार निवडणार आपले प्रतिनिधी; ९८० ग्रामपंचायतींत १५ जानेवारीला होणार मतदान

राजकुमार भितकर

यवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावगाड्यातील वातावरण ढवळून निघत आहे. 30 तारीख  नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस असतानाच तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी उसळली होती. जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीसाठी 14 लाख मतदार आपले प्रतिनिधी निवडणार आहेत. या निवडणुकीत गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाची सत्ता यावी, यासाठी गावपुढाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे. पॅनेलची जुळवाजुळव करण्यात आली आहे. कालपर्यंत एकाच गटात असणारे दूर गेले तर, दुसऱ्या गटातील पुढारी विरोधी गटाला येऊन मिळाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना विकासनिधी देण्याची घोषणा मंत्री, आमदारांनी केली आहे. त्याला गावपुढारी कितपत प्रतिसाद देतात. हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. राजकारणाचा पहिला पाया म्हणून ग्रामपंचायतींकडे बघितले जाते. ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींच्या सत्तेसाठी वर्षभर सोबत राहणारे व जिवाभावाचे लोकही विरोधात जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष प्रत्यक्षात रिंगणात उतरत नसले, तरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राजकारणातील घडी घट्ट करण्याचा प्रयत्न राहतो. जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींमधून आठ हजार 141 सदस्य निवडून येणार आहेत. सदस्यांमधूनच सरपंचांची निवड केली जाणार आहे. जुने आरक्षण रद्द करण्यात आले असून, मतदानानंतर आरक्षण जाहीर केले जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी ऑनलाइन नामांकन दाखल केले. मात्र, सर्व्हरडाऊनच्या खोड्यामुळे अखेरच्या क्षणी ऑफलाइनचा पर्याय देण्यात आला. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात चांगलीच झुंबड उडाली होती. जिल्ह्यातील प्रभागांची संख्या तीन हजार 73 आहे. यात महिला मतदार सहा लाख 80 हजार 488 असून, पुरुष मतदार सात लाख 39 हजार 951 आहेत. आठ इतर मतदार आहेत. या आकड्यात फरकही पडण्याची शक्‍यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT