17 child died in amravati district
17 child died in amravati district 
विदर्भ

धक्कादायक! अमरावतीत एकाच महिन्यात दगावली १७ बालके

सुधीर भारती

अमरावती : एकाच महिन्याच्या कालावधीत एकट्या धारणी तालुक्‍यात १७ नवजात बालके दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साद्राबाडी, बैरागड या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हे बालमृत्यू झाल्याची बाब निष्पन्न झाली आहे. आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स तसेच कर्मचारी हजरच राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. 

एकीकडे मेळघाटमधील बालमृत्यू तसेच मातामृत्यूची संख्या वाढत चालली आहे. आरोग्याच्या आधुनिक सोईसुविधांचा अभाव, साक्षरतेचे कमी प्रमाण यामुळे या भागात जास्तीत जास्त बालमृत्यू ओढावतात. तसेच कुपोषणामुळे देखील अनेक बालकांचे मृत्यू होतात. मेळघाटात हे सर्व सुरू असतानाच एका महिन्यात साद्राबाडी आणि बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये १७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  विशेष म्हणजे बालमृत्यूप्रमाणेच माता मृत्यूची संख्या सुद्धा वाढल्याचा आरोप जिल्हापरिषद सदस्यांनी  केला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाहीत, मुख्यालयी असले तरी अनेक कर्मचारी हे आरोग्य केंद्रात ठरलेल्या वेळेत सेवा देत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत आहेत. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

एका महिन्यात दगावलेले नवजात शिशू हे कमी वजनाचे होते. आशा तसेच अंगणवाडी सेविकांकडून पोषणाहाराबाबत लक्ष दिले जात आहे. त्यापैकी काही बालकांचा अ‌ॅनिमियामुळे मृत्यू झाला. 
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT