2 died in tiger attack in chandrapur 
विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात काकासह पुतण्याही ठार, कुटुंबीयांनी फोडला एकच हंबरडा

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : मोहफुल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या काका, पुतण्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. मंगळवारी (ता. 6) सकाळच्या सुमारास पवनपार ते खैरी मार्गावर ही घटना घडली. मृताचे नाव कमलाकर ऋषी उंदिरवाडे (वय 65), दुर्वास उंदिरवाडे (वय 48) अशी मृतांची नावने आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. 

सिंदेवाही तालुक्‍यातील बहुतांश भाग जंगलाने व्याप्त आहे. अनेक गावे जंगलाला लागूनच आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच गावात असतो. सध्या मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे. हाताला कामे नसल्याने अनेकजण सकाळीच जंगलात जाऊन मोहफुल संकलित करतात. पवनपार येथील कमलाकर ऋषी उंदिरवाडे आणि दुर्वास उंदिरवाडे हे काका पुतणे मंगळवारी सकाळीच पवनपार येथील जंगलात गेले होते. 

पवनपार ते खैरी या मार्गावर दोघेही मोहफुल गोळा करीत होते. त्याने दबा धरून बसेलल्या वाघाने आधी काकावर आणि नंतर पुतण्यावर हल्ला करून ठार केले. या घटनेची माहिती गावात पसरली. त्यानंतर वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळावर पवनपार, गुंजेवाही, पवना, खैरी, टेकरी, सामदा या गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. दरम्यान, या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

SCROLL FOR NEXT