2 pet animals attacked by leopard in Tivasa in Amravati district  
विदर्भ

नागरिकांनो सावधान, घराबाहेर पडू नका तालुक्यात फिरतोय बिबट्या; २४ तासांत दोन जनावरांची शिकार.

प्रशिक मकेश्वर.

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यात बिबट दिसल्याने चांगलीच खळबळ उडाली असून काल संद्याकाळी 7वा तालुक्यातील विंचुरी तळेगाव ठाकूर शेतशिवारात एका बैलाची शिकार केल्याची घटना घडली तर सकाळी पहाटे माळेगाव शेत शिवारात एका लहान बछडाला जखमी केले 24 तासात एकाच परिसरात दोन जनावरांची शिकार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

 चार दिवस आधी तिवसा महसूल प्रशासनाला तालुक्यातील वरुडा दापोरी या परिसरात दोन बिबट दिसून आल्याने तालुक्यात जंगली जनावरांचा ठिय्या मानवी वस्तीकडे येत येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून भीती वर्तविली जात आहे तालुक्याचा वनपरिक्षेत्र भाग हा मोठा असून जंगल परिसराने व्यापला आहे.

या भागात बिबट व इतर जनावरे नेहमीच शेतकऱ्यांचे नुकसान करतात काल तालुक्याच्या मौजा विंचुरी तळेगाव ठाकूर व माळेगाव या शेत शिवारातून दोन जनावराची शिकार झाल्याचे उघडकीस आले यामध्ये स्वप्नील देवडे यांच्या शेतात असलेल्या बैल जोडीतील एका बैलावर झडप घालून बैलाला ठार केले तर माळेगाव या शेत शिवारात भीमराव चव्हाण राहणार गुरुदेव नगर यांच्या शेतातील लहान वासराला जखमी केल्याने वासराचा मृत्यू झाला.

दोन्ही घटनास्थळाचा तिवसा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे  24तासात दोन जनावराची शिकार झाल्याने या भागात दहशतीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये दिसत असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाकडून करण्यात आले आहे. 

तिवसा महसूल प्रशासनाला चार दिवसा आधी दिसलेल्या 2 बिबट्याची दहशत निर्माण झाल्याचे दिसत आहे एकाच दिवशी दोन जनावरांची शिकार झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे या बिबट्याला परिसरातून हाकलून लावावे किंवा जेरबंद करावे अशी मागणी आता या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT