3 people of same family no more due to drowning in river
3 people of same family no more due to drowning in river  
विदर्भ

हृदयद्रावक! लहान मुलं बुडताना बघून जीवाची पर्वा न करता नदीत घेतली उडी; पण काळाने केला घात 

राजू तंतरपाडे

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : अधिक महिना असल्यामुळे आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेली तीन मुले पाण्यात बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या तीन महिलांपैकी एक दगावल्याने मृतांची संख्य चारवर पोहोचली. धामणगावरेल्वे तालुक्यातील चंद्रभागा नदीपात्रातील नभोरा राज गावात रविवारी (ता. २७) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

यश प्रमोद चवरे (वय ११), जीवन प्रदीप चवरे (वय १५), सोहम दिनेश झेले (वय १०), पुष्पा दिलीप चवरे (वय ३२, सर्व रा. निंभोरा राज), अशी या घटनेतील मृतांची नावे असल्याचे दत्तापूर पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

लहान मुले बुडत असल्याचे बघून त्यांना वाचविण्याकरिता जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरलेल्या दोन महिला या घटनेत जखमी झाल्या. जखमी महिलांवर धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेतील मृतांमध्ये महिलेसह तिच्या मुलाचा समावेश आहे.

एकादशीनिमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करायला गेल्यानंतर ही घटना घडली. पुष्पा चवरे यांनी आज एकादशीनिमित्त पूजा केली होती. पुजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तीनही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही मुख्य प्रवाहात गेले आणि नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदीपात्रात पहिल्यांदा उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या बेबी प्रदीप चवरे (वय ३५) व अन्य अशा तिघींनी बुडालेल्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यात त्यांना यश आले नाही. वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या  तिन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमींपैकी पुष्पा यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

इर्विनमध्ये आणल्यावर डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. निंभोरा गावाच्या बाजूनेच समृद्धी महामार्ग जात आहे. या मार्गाच्या कामासाठी नदीत अवैधरीत्या खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. यात प्रचंड पाणी असल्याने हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यांत बुडून मायलेकरांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. 

त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारावर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गावक-यांनी घेतल्यामुळे घटनास्थळी काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. 

याप्रकरणी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार संबंधित विभागाने आर्थिक मदतीचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले. त्यामुळे तणाव निवळला.
-डॉ. हरिबालाजी एन.
पोलिस अधीक्षक, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT