chandrapur power station 
विदर्भ

७२ तासांपासून आंदोलक वीज केंद्राच्या चिमणीवर; ऊर्जामंत्री म्हणतात, खाली उतरला तरच चर्चा... 

प्रमोद काकडे

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला तब्बल 72 तासांचा कालावधी उलटला. सात आंदोलक वीज केंद्राच्या संच क्रमांक आठच्या चिमणीवर ठाण मांडून आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंदोलक चिमणीवरून खाली आल्याशिवाय चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलकांच्या प्रतिनिधींशी ऊर्जामंत्र्यांची चर्चा निष्फळ ठरली. दुसरीकडे कायमस्वरूपी नोकरीचा आदेश मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, यावर आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चांगलेच चिघळले आहे. 

वीज केंद्राच्या निर्मितीसाठी हजारो हेक्‍टर शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली. आजवर अनेक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र, अद्यापही जिल्ह्यात सहाशेच्यावर प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील अनेकांनी आपली वयोमर्यादा सुद्धा ओलांडली आहे. प्रकल्पग्रस्त शैक्षणिकदृष्ट्या पात्र असतानाही वीज केंद्राने त्यांना नोकरीत सामावून घेतले नाही. काहींना प्रशिक्षणार्थी म्हणून तुटपुंज्या मानधनावर वीज केंद्रात कामावर घेतले आहे. शेती गेली. नोकरीही मिळेना, अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. 

आजवर प्रकल्पग्रस्तांनी अनेक आंदोलने केली, निवेदने दिली; परंतु त्याची दखल घेतली नाही. कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात जवळपास पाचशे प्रकल्पग्रस्तांनी वीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. तेव्हा जमावबंदीचा धाक दाखवून त्यांचे आंदोलन मोडीत काढले. बुधवारी विद्याताई झाडे, रामाताई कातकर, परेश भगतकर, प्रमोद घरमडे, मंगेश खोब्रागडे, प्रशांत ढवस, सुनील वानखेडे हे प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त वीज केंद्राच्या संच क्रमांक आठच्या चिमणीवर अचानक चढले. आधी नोकरीचा कायमस्वरूपी आदेश द्या, या मागणीवर प्रकल्पग्रस्त ठाम आहेत.

चिमणीवर सात आणि खाली उर्वरित प्रकल्पग्रस्त असे या आंदोलनाला स्वरूप आले आहे. पोलिस आणि औद्योगिक सुरक्षा दल आंदोलन स्थळी तैनात आहे. दरम्यान, काल, गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बैठक बोलावली. मात्र, आंदोलक खाली उतरले नाही. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलनावर कोणताच तोडगा निघू शकला नाही. आंदोलक तीन दिवसांपासून चिमणीवरच आहे. दरम्यान त्यांना जेवण आणि पाणी चिमणीवर पाठविण्याची व्यवस्था वीज केंद्राच्या प्रशासनाने केली आहे. 

आधी खाली या, मगच चर्चा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रकल्पग्रस्त संदर्भात नागपुरात बैठक लावली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्यासह वीज केंद्राचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. ठरल्यानुसार प्रकल्पग्रस्तांचे पाच प्रतिनिधी बैठकीला पोचले. मात्र, ऊर्जामंत्र्यांनी यावेळी वेगळीच भूमिका घेतली. आधी आंदोलकांनी चिमणीच्या खाली उतरावे. आंदोलन मागे घ्यावे, त्यानंतरच चर्चा होईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कायमस्वरूपी नोकरीचा निर्णय होईपर्यंत चिमणीवरच राहण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. 

भाजप नेत्यांची चुप्पी 

जिल्ह्यातील कोणत्याही प्रश्‍नावर हक्काने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनावर चुप्पी साधली आहे. 72 तासांपासून आंदोलक चिमणीवर चढून आहेत. आंदोलन चिघळले आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून प्रकल्पग्रस्तांची बाजू घेण्यासाठी भाजपचे कोणतेही नेते समोर आले नाही. आता ऊर्जामंत्र्यांच्या भूमिकेनंतर तरी या नेत्यांचे तोंड उघडणार का? याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : म्हैसूर दसरोत्सव उद्‍घाटन वाद सर्वोच्च न्यायालयात; आज सुनावणी

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT