कामठी: येथील ड्रॅगन पॅलेस
कामठी: येथील ड्रॅगन पॅलेस 
विदर्भ

ड्रॅगन पॅलेस टेम्पल विकासासाठी 75 कोटींची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

कामठी  (जि.नागपूर) : येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट पार्क, पर्यटन सुविधा, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी 214 कोटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली होती. यापैकी कामाचा टप्पा-1 ला 75 कोटी 16 लक्ष रुपयांच्या निधीला आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सर्वसाधारण योजनेतून हा निधी मंजूर करण्यात येणार आहे.
या प्रस्तावातील सर्व कामे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या विषयाला मंजुरी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या 214 कोटींच्या विकास आराखड्‌याला जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीने 2015 मध्ये मान्यता देऊन शासनाकडे हा आराखडा सादर केला होता. ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करणे, या परिसराचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, ऍम्युजमेंट पार्क, वीज जोडण्या, पाणीपुरवठा, विपश्‍यना ध्यान केंद्राचे बांधकाम, डॉ. आंबेडकर बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृह, विविध विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या कामास पुरवणी मागणीद्वारे निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असून उच्चाधिकार समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार ऑकोमोडेशन व इन्फ्रास्टक्‍चरशी संबंधित आवश्‍यक ती कामे पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यासाठी 75 कोटी 16 लक्ष इतका निधी सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्‍चर 30 कोटी 42 लाख, ऑकोमोडेशन 44 कोटी 74 उपलब्ध करून दिले जातील. यात बाह्य विद्युतीकरण, एक्‍सर्टनल प्लंबिंग, सॅनिटेशन, अग्निप्रतिरोध यंत्रणा, वास्तुविशारद शुल्क आदींचा समावेश आहे.
मैत्री आणि मानव कल्याणकारी केंद्र
डॅगन पॅलेस टेंपलची निर्मिती 1999 मध्ये जपानच्या बौद्ध महाउपासिका श्रीमती नोरिको ओगावा आणि ऍड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रयत्नांनी झाली. हे पॅलेस आंतरराष्ट्रीय शांती, मैत्री आणि मानव कल्याणकारी केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. धम्म चक्रप्रवर्तन दिनाच्या दिवशी 10 लाख पर्यटक आणि बौध्द उपासक या ठिकाणी भेट देत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT