82 years old man doing fruit selling business for family livelihood in pusad of yavatmal 
विदर्भ

कुरकुरणारी सायकल अन् थरथरणारे हात; वयाच्या ८२ व्या वर्षीही फळविक्रीतून करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ): कोरोना काळात छोट्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट आले. परंतु, कष्टाळू लोकांनी ते आव्हान लीलया पेलले. पुसदजवळच्या भीम नगरातील वामन मारुती कांबळे या ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने शहरभर सायकलवर फिरून फळविक्री केली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कष्टाला जिद्दीची जोड मिळाली तर काहीही करू शकतो, असे सांगत त्यांनी तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

निरक्षर वामन यांचे मूळगाव चिकणी. जवळपास तीस वर्ष त्यांनी मोलमजुरी केली. पाच पोती ज्वारी व दोन हजार रुपये एवढी त्यांची वर्षाची मिळकत. परवडत नसल्याने नंतर त्यांनी भाजीपाला व फळ विक्रीतून उपजीविकेचा मार्ग निवडला व ते पुसदला आले. सुरुवातीला कुडाच्या घरात दिवस काढले. पत्नी सुभद्रा यांनी भाजीपाला विक्रीला हातभार लावला. तीस वर्षांपूर्वी वामन यांनी एक सायकल विकत घेतली. त्यावर मोठी टोपली बांधली आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. भल्या पहाटे पाच वाजता उठून पुसदच्या भाजी मंडईत पोहोचणे. शेतकऱ्यांची हर्राशीतील ताजी फळे खरेदी करणे व नंतर सायकलवर शहरातील विविध वसाहतीतून फळांची दिवसभर विक्री करणे व नंतरच जेवण, असा त्यांचा नित्यक्रम. थंडी, पाऊस असो वा रखरखते ऊन त्यांच्या फळ विक्रीच्या सायकल फेरीत कधीही खंड पडला नाही.

पपई ,पेरू, चिक्कू, सीताफळ, केळी, सफरचंद अशी मंडईतील उपलब्ध फळे ते सायकलवरून विक्री करतात. मंडईतील दर्जेदार फळे, तेही योग्य दरात घरासमोर नियमितपणे उपलब्ध होत असल्याने ग्राहक त्यांची आतुरतेने वाट पाहतात. विशेष म्हणजे कोरोना काळात रोगप्रतिकार शक्तीचे महत्व पटल्याने नागरिकांनी फळ खरेदीवर मोठा भर दिला. त्यामुळे फळविक्रीत चांगली वाढ झाल्याचे वामन सांगतात. लॉकडाऊन काळात त्यांनी सायकलवर पायडल मारत नागरिकांना फळे उपलब्ध करून दिली.

वामन यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फळ विक्रीतून चालतो. त्यांच्या विलास नावाच्या तरुण मुलाचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने मृत्यूपूर्वी बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारी करून कुडाचे घर बदलले. वडिलांच्या संसाराच्या गाड्याला थोडाफार हातभार लावला. मुलाच्या अकाली निधनाने ते दुःखी झाले. परंतु, या संकटाला दूर सारत वामन यांनी फळांच्या टोपलीला सायकलवरून गती दिली. आता सायकलही जुनी झाली. घंटी सोडून तिचे सगळे भाग कुरकुरतात. मात्र, गात्र थकली तरी वामन यांचा आत्मविश्वास तसूभरही कमी झालेला नाही. दररोज ते पूर्वी एवढीच मेहनत घेतात. साधारणत: एक ते दीड हजारापर्यंत फळविक्री होते. त्यातून त्यांना ४५० ते ५०० रुपयापर्यंत मिळकत पदरात पडते. पत्नी, सून सोबत तीन नातवंडे , त्यांचे शिक्षण असा कुटुंबाचा गाडा वामन यांच्या अविरत धावणाऱ्या सायकलच्या चाकांवर  चालत आहे.

हेही वाचा -

कष्टातून प्रगतीची चाके उभारी घेतात, हा आदर्श वामन यांनी युवा वर्गासमोर ठेवला आहे. कष्टातून यश तर मिळतेच, शिवाय प्रकृती ठणठणीत राहते. सायकलवरून विक्रीसाठी फिरल्याने अंगकाठी काटक बनली. कधीही दवाखान्याची पायरी चढण्याची त्यांना गरज भासली नाही. कोरोना विषाणूंना त्यांनी दाद दिली नाही. वामन म्हणतात- " असू द्या कोरोना... नको रोना... ताजी फळे खा ना ..."

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT