9570 blood bags collected during lockdown period in Yavatmal  
विदर्भ

क्या बात है! कोविड काळातही 9 हजार 570 रक्तपिशव्यांचे संकलन; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अव्वल

सुरज पाटील

यवतमाळ : कोविड काळात जगाची चक्रे थांबली असतानाच बाधितांना रक्ताची गरज पडली. या संकटसमयी रक्तदाते मदतीला धावून आलेत. वर्षभरात 142 शिबिरांच्या माध्यमातून नऊ हजार 570 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्यामुळे बऱ्यापैकी रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी एकमेव आशेचा किरण आहे. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी धाव घेतात. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त, थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. शिवाय अपघातग्रस्तांनाही रक्ताची आवश्‍यकता असते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही रक्त दिले जाते. 

अशावेळी रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध राहावा, यासाठी सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिरांच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जाते. "रक्तदान सर्वश्रेष्ठ दान' चळवळ ग्रामीण व शहरी भागातील चांगलीच रुजली आहे. रक्तदान करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील तीन वर्षांत सर्वाधिक पिशवीचे रक्तसंकलन करून वैद्यकीय महाविद्यालय अव्वल राहिले आहे.

मागील तीन वर्षांत सर्वाधिक रक्तसंकलन करून वैद्यकीय महाविद्यालय अव्वल राहिले आहेत. सामाजिक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी रक्तदानात पुढाकार घेत असल्याचे सकरात्मक चित्र आहे. 26 लाख रुपये किंमतीची रक्तसंकलन वाहिनी मिळाल्याने ग्रामीण भागात जाऊन रक्तसंकलन करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही.
- डॉ. मिलिंद कांबळे
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत प्रभाग 59 मध्ये एकूण 24896 मतदान, 11 उमेदवार मैदानात... कोण जिंकणार?

BMC Election Result : मुंबई कुणाची? मतमोजणीला सुरुवात, पहिले कल आले समोर

Kolhapur Municipal Election Results : कोल्हापुरात मतमोजणीला सुरूवात, सजेत पाटील, धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागरांची प्रतिष्ठा पणाला

Gold Rate Today : राज्यात महापालिका निकालाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; खरेदी करण्याआधी पाहा आजचे भाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांसह शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT