Accidental death of famous rangoli artist Yuvraj Behre of Gadchiroli sakal
विदर्भ

Accident News : गडचिरोलीचे प्रसिद्ध रांगोळीकार युवराज बेहरे यांचा अपघाती मृत्यू

नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळी या गावाजवळ अपघात

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकार युवराज व्यंकट बेहेरे (वय ५०) रा. गडचिरोली यांचा रविवार (ता. १८) नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे ४ वाजता कोंढाळी या गावाजवळ अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी विभा बेहरे (वय ४५) जखमी झाल्या असून त्या नागपुर रुग्णालयात भरती आहेत.

मृत युवराज बेहरे आपल्या स्वतःच्या एमएच ३४ व्ही ३४२९ वाहनाने कुटुंबीयांसह महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते. शेगाव दर्शन करून आपल्या घरी परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच चालक ऋषी बोरकुटे रा. काटली (वय ३०) हे गंभीर जखमी आहेत. नागपूर येथील खासगी इस्पितळात भरती आहेत. बेहरे यांच्या पश्चात दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने बेहरे परिवारावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Tirupati Balaji: ‘तिरुपती’चे चार कर्मचारी धर्मावरुन निलंबित; देवस्थानचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT