Accidental death of a young man in Daryapur 
विदर्भ

'त्याला' सतत मरणाची भीती वाटायची, आणि एक दिवस 

शशांक देशपांडे

दर्यापूर (जि. अमरावती) : तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा. 15 वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. आई आणि बहिणींचा तो एकुलता एक आधार. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याला सतत मृत्यूची भीती वाटत होती. तसे स्वप्नही त्याला पडत होते. सततच्या चिंतेमुळे त्याच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता. यावर डॉक्‍टरांचे उपचारही सुरू होते. अशाच नैराश्‍यमयी अवस्थेत एक दिवस अघटित घडले. 

आकाश कुटुंबातील एकुलता एक मुलगा. घरात तीन बहिणी लग्नाच्या, वडील 15 वर्षांपूर्वीच मरण पावले. घरी शेती नाही. केवळ मजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. आकाशला गेल्या काही दिवसांपासून सतत मरणाची भीती वाटत होती. त्यामुळे रक्तदाब वाढत होता, आई व बहिणीने दर्यापुरातील रुग्णालयात तपासणीकरिता आणले होते. तपासणी झाल्यावर हे कुटुंब आई, बहीण व आकाश आपल्या गावी जाण्याकरिता निघाले. दरम्यान येथील एसटी स्टॅण्डजवळील पनपालिया किराणा दुकानासमोर भररस्त्यावर कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकने चिरडल्याने आकाश विजय राऊत (वय 30, रा. आराळा) याचा जागीच मृत्यू झाला. 

एसटी स्टॅण्डजवळ पायदळ चालत असताना मागून कापसाच्या गाठी भरलेला ट्रक शहरातून जात असताना व एकल रस्ता असल्याने वाहतुकीची गर्दी झाली होती. अचानक आकाश ट्रकच्या बाजूला ओढला गेला अन्‌ खाली पडून संपूर्ण ट्रक आकाशला चिरडून निघून गेला. या घटनेने अपघातस्थळी एकच हल्लकल्लोळ उडाला. लोकांची गर्दी जमली. आकाश या अपघातात जागीच ठार झाला होता. अपघात एवढा भीषण होता की आकाशचे धड व पाय वेगळे झाले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दर्यापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत गर्दी पांगविली. रुग्णवाहिका बोलावून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविले. पुढील तपास दर्यापूर पोलिस करीत आहेत. 
 

कुटुंबावर मोठा आघात 


आकाशच्या कुटुंबात तो तीन बहिणी आणि आई आहे. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. कुटुंबात कमावता एकमेव असल्याने आकाशवर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. बहिणीच्या लग्नाची त्याला चिंता होती. परंतु मुलाच्या अचानक जाण्याने आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT