Accused of shoplifting arrested in Amravati 
विदर्भ

अमरावतीत दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस व मुद्देमाल जप्त

कृष्णा लोखंडे

अमरावती   ः मध्यरात्रीच्या वेळी दुकाने फोडून लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 22) जेरबंद केले. आरोपींकडून दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस तसेच 12 लाख 83 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

साजीद खान साकेर खान (वय 28, रा. लायरा, मध्य प्रदेश), सलमान वल्द अल्लाबक्ष खान (वय 25, रा. बासुदा, मध्य प्रदेश), इम्रान जमील बाबू खान (वय 33, रा. सावखेडी, मध्य प्रदेश), सय्यद अक्रम असद अली (वय 32, रा. रायसेन, मध्य प्रदेश) व सिकंदर अली वल्द मोहम्मद अली (वय 55, रा. अंबाडा, मोर्शी), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवारी (ता. 21) रात्री मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथील सराफा व टायरचे दुकान फोडून 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.

अधिक वाचा - Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत मुथूट फायनान्सवर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह लाखो रुपये लंपास

 
याप्रकरणी मोर्शी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखाही चोरट्यांच्या मागावर होती. तपासात या गुन्ह्यामध्ये अंबाडा येथीलच रहिवासी सिकंदर अली याचा हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सिकंदर अलीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार मध्य प्रदेशातील या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले. 

त्यांच्याकडून दोन देशीकट्टे, तीन जिवंत काडतूस, सोन्या-चांदीचे दागिने, 17 टायर, पाच मोबाईल, रोख व एक चारचाकी वाहन, असा एकूण 12 लाख 83 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी मोर्शी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्‍यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरीक्षक विजय गराड व पोलिस उपनिरीक्षक आशीष चौधरी यांच्या पथकाने केली.   

संपादन : अतुल मांगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक जिंकताच सरकारचा ‘Big Decision’! मुंबई पोलिसांसाठी ४५ हजार शासकीय घरांना मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत ११ मोठे निर्णय

Latest Marathi News Live Update : आंबप गावात गवा रेड्याचा धुमाकूळ! शाळेत शिरताच विद्यार्थ्यांची पळापळ

Sharad Pawar NCP Defeat : राष्ट्रवादी शरद पवार गटाला तब्बल १८ मनपात शून्य जागा, तुटपुंज्या यशाची 'ही'आहेत ७ कारणे

Uddhav Thackeray : मुंबईत आपला महापौर व्हावा, हे स्वप्न! मुंबईच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

Girish Mahajan : ‘१०० प्लसचा मानस होता’; एबी फॉर्मच्या गोंधळामुळे भाजपला फटका-गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT