Pix_Pratik
Pix_Pratik
विदर्भ

लसीकरणाला शिस्त लावणारा 'अचलपूर पॅटर्न'ची सर्वत्र चर्चा ; वैद्यकीय अधिक्षकांनी लढवली शक्कल

राज इंगळे

अचलपूर ः शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, सांगूनी गेले रथी-महारथी किंचीतसी शक्कल लढवा, जे हवे ते मिळते जगती, या म्हणीप्रमाणे जर आपण समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला तर निश्‍चितच शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल, यात काही शंका नाही. अशीच अनोखी शक्कल अचलपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी लढवली आहे. या युक्तीचा परिणाम म्हणून लसीकरण केंद्रावरील गर्दी ओस पडली आहे. त्यामुळे या अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

जुगाड हा भारतीयांचा आत्मा आहे. कोणताही प्रश्‍न असू द्या त्याला सोडवण्यासाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हाच आपला नेहमीचा ध्यास राहिला आहे. प्रत्येक समस्येवर काय काय उपाय करता येईल, हे भारतीय नित्याने शोधत असतो मग त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने युक्ती करतो, अशीच युक्ती उपजिल्हा रुग्णलयातील लसीकरण केंद्रावरील गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी लढवली आहे. त्यांच्या या युक्तीमुळे उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राच्या ठिकाणची गर्दीमुळे होणारा गोंधळ कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात 1 मेपासूूून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. या वयोगटातील संख्या अधिक असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे, त्यातून संसर्ग वाढण्याची भीती आहे, हे लक्षात घेऊन अचलपूर येथील उपजील्हा रुग्णालयात लसीकरणाचा अनोखा पॅटर्न राबवला जात आहे. या पॅटर्ननुसार लसीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींनी केंद्राबाहेर ठेवलेल्या एका डब्यात चिठ्ठी टाकायची आणि शांतपणे घरी जायचे, त्यानंतर फोन आला की लसीकरणासाठी यायचे, अशी ही पद्धत आहे.

या अनोख्या युक्तीमुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी तर सोडाच रांगाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे एक मेपासून सुरू झालेल्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर हा पॅटर्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे. परिणामी लसीकरणाचा हा पॅटर्न अत्यंत यशस्वी ठरला असून राज्यभरातील लसीकरण केंद्रांना दिशा देणारा आहे.

रुग्णालयाच्या परिसरात पहिला डोस व दुसरा डोस, असे दोन प्रकारचे डबे ठेवण्यात आले आहेत. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना या डब्यात नाव, वय, मोबाइल नंबर, कोविशिल्ड व कोव्हॅक्‍सिन, असा उल्लेख केलेले कूपन टाकण्यास सांगून घरी पाठवले जाते. त्यानंतर त्यांना फोन करून बोलावण्यात येते. त्यामुळे नागरिकांनाही लस घेणे सोपे झाले आहे.
-डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT