prakash ambedkar.jpeg 
विदर्भ

Lockdown : ॲड. प्रकाश आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केली ही महत्त्वाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : संपूर्ण मे महिना लॉकडाउनमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हातात पैसा नसल्याने शेतीची कामे करता येणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, मे महिन्यात शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासनाने आदेश जारी करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

जून महिन्यात पावसाळा सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मे महिन्यात शेतीची कामे उरकली नाहीतर जून मध्ये पेरणी करायला उशीर होतो. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, असल्याचे आंबेडकर म्हणाले.

बँकात होणार गर्दी, अधिकाऱ्यांनी जावे गावात
सावकार कर्ज द्यायला तयार नाही आणि कोणी सोने गहाण ठेवायला तयार नाही. अशा परिस्थितीत बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकांकडे धाव घेईल. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याचे नियम पायदळी तुडवले जातील. त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेत न बोलविता बँक अधिकाऱ्यांनीच गावा गावात जाऊन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचनाही आंबेडकर यांनी केली आहे.

जुन्या, नवीन कर्जाचा ताळमेळ बसवा
मागील असलेले कर्ज आणि आताचे नवीन कर्ज विचारत घेता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी जुन्या, नवीन कर्जाचा ताळमेळ बसवून तसे आदेश शासनाने काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

शहरी व ग्रामीण भागातील झोनबाबत संभ्रम दूर करा
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात तीन झोन करण्यात आले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या भागाला रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. ग्रामीण भागात अशी परिस्थिती नसल्याने त्या भागांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आले आहे. हे झोन शहरापुरते मर्यादित आहेत की, ग्रामीण भागापूरते हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रमही दूर करण्यात यावा, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Policy : ऑनलाइन फसवणुकीत तुमच्या पैशांचे नुकसान झाले? घाबरू नका, RBI देणार ₹25,000 पर्यंत भरपाई! काय आहे मोठा निर्णय?

आणि भरत जाधवमुळे मकरंद अनासपुरेंनी मिशी काढली.... 'साडे माडे तीन'च्या वेळेचा न ऐकलेला किस्सा

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

अशोक सराफांची 'प्रियतमा' जगतेय हलाखीत आयुष्य ! कशी झाली 'ही' अवस्था जाणून घ्या

Leopard Attack Sangli : 6 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद; पिंजऱ्यात कैद करुन वन विभागाने कुठे नेले त्याला...

SCROLL FOR NEXT