contenment zon 2 
विदर्भ

अरे देवा ! पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी कार्यक्रमात सहभाग घेतला; मग काय झाले, वाचा...

सकाळ वृत्तसेवा

पातूर (जि. अकोला) : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, अकोला शहरासह आता ग्रामीण भागातही त्याचा हळूहळू शिरकाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पातूर शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच तीन महिन्याच्या बाळासह दोन कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने शिर्ला ग्रामपंचायत हद्दीत बाधित रुग्ण नसल्यामुळे जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

स्वतःहून केली तपासणी
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण अकोला येथील गायत्रीनगर मध्ये कोरोना बाधित कुटुंबाच्या एका खासगी कार्यक्रमात संपर्कात आला होता. परंतु, त्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळून आल्याने त्यांनी स्वतःहून पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय तपासणी केली होती. परंतु, तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यामुळे त्यांना जिल्हा आरोग्य केंद्रात रेफर करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठवले असता, त्यांचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. शिर्ला ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक राहुल उंदरे यांनी तत्काळ प्रशासनाच्या मदतीने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा परिसराची पाहणी करून प्रतिबंधित क्षेत्राची आखणी करून परिसरस सिल करण्याची प्रक्रियेला सुरुवात केली. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिने फॉगिंग मशीन व्दारे परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू असून, आरोग्य पथकाने आरोग्य सर्वेक्षण सुरुवात केली आहे.

कार्यक्रमात भाग घेणे आले अलंगड
पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतमधील वास्तव्यास असलेला व्यक्ती अकोला येथील गायत्रीनगरातील कोरोना बाधित रुग्णाच्या डोहाळे कार्यक्रमात सहभागी झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याच कार्यक्रमानंतर त्याला सर्दी, खोकला, ताप असा आजार जाणवू लागला त्यामुळे त्याने स्वतः पुढाकार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी त्याच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले.

921 नागरिकांची केली आरोग्य तपासणी
परिरातील 194 कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण झाले असून, त्यामधून 921 नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. हायरिस्क मधील कुटुंबातील पाच व्यक्तींना क्वारंनटाईन केले असून, 83 नागरिक लोरिस्क मध्ये आहेत. सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र तयार केला असून, या क्षेत्रामध्ये कोणीही ये-जा करणार नाही. जीवनावश्यक म्हणून क्षेत्राबाहेर किराणा दुकान, दूध व भाजीपाल्याची व्यवस्था शनिवारपासून करण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य करावे व प्रशासनाने नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
-राहुल उंदरे, ग्रामविकास अधिकारी, शिर्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT