killing. 
विदर्भ

आधी नशा केली; वाद झाला, मग घडला हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन युवकांनी एका 56 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण करून खुन केल्याची घटना सोमवारी (ता.25) सायंकाळी तालुक्यातील मांजरी येथे उघडकीस आल्याने या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार विलास पाटील व त्यांचा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून या प्रकरणी दोन युवकांना अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

असा झाला वाद
बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मांजरी येथे ही घटना घडली असून नागोराव राजाराम मुंडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास गावातील दोन युवक महादेव गोकूळ पवार (वय 26), रुपेश सदानंद गाडगे (वय 28) व 56 वर्षीय नागोराव मुंडे हे तिघेही गावातील एका सलूनच्या दुकानावर मद्यधुंद अवस्थेत होते. तिथे त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने नागोराव मुंडे यांना पोटात मुकामार लागला. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उरळ ठाणेदार विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नागोराव मुंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे रवाना केला. दोघांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याची तक्रार मृताची पत्नी मीराबाई नागोराव मुंडे यांनी उरळ पोलिस ठाण्यात दिली असून, या तक्रारीची दखल घेत उरळ पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी
बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी जंगलात पळ काढला. मात्र, उरळ ठाणेदार विलास पाटील, पोलिस कर्मचारी दादाराव लिखार, राजेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींचा पाठलाग करून तत्काळ ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 11th admission online: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन नोंदणीला शुक्रवारपासून प्रारंभ; दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

Baramati News: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे का घेतला? हर्षवर्धन सपकाळांनी खरं कारण सांगितलं; आतली बातमी आली समोर

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

SCROLL FOR NEXT