mahan dharan.jpg 
विदर्भ

अकोलेकरांचे पाणी पिण्याचे झाले वांदे... काय झाल वाचा

सकाळ वृत्तसेवा

महान (जि. अकोला) : अकोला महानगरपालिकेकडे डिसेंबर 2019 पासून तीन कोटी 55 लाख 85 हजार 206 रुपयाचे देयकाचा भरणा केला नसल्याने पाटबंधारे विभागाने अकोला शहराचा पाणी पुरवठा सोमवार (ता.10) पासून बंद केला आहे.


हे वाचा - प्रवेश एकीकडे; शिकवणी दुसरीकडे
मनपाकडून नोटीसला केराची टोपली

अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा धरणामधून नियमित पाणी पुरवठा केल्या जातो. परंतु, डिसेंबर 2019 पासून महानगर पालिकाकडे थक बाकी होती. पाणी पट्टी भरण्याबाबत अकोला पाटबंधारे विभागाने मनपाला विनंती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील भाग 6 (1) मधील कलम 49 (ज) अन्वये, अकोला पाटबंधारे विभागाचे नोटीस व्य-3/2020 ता.2 फेब्रु. 2020 नुसार सात दिवसाच्या आत थकीत असलेल्या पाणीपट्टीचा भरणा करावा असे सूचित करण्यात आले होते. तरी देखील अकोला महानगर पालिका प्रशासनाने थकीत पाणीपट्टीचा भरणा न केल्यामुळे शेवटी सोमवारी (ता.10) महान धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, बोरगाव मंजूचे सहाय्यक अभियंता अभिजीत नितनवरे यांच्या आदेशानुसार महान धरणाचे एस. व्ही. जानोरकर, मनोज पाठक यांनी पाणी पुरवठा बंद केला.


क्लिक करा - हद्दवाढीत बांधकामांची कोंडी
पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

अकोला महानगर पालिकेला थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी संपूर्ण एका आठवड्याचा वेळ दिला होता. परंतु, पाटबंधारेच्या विनंतीकडे मनपा प्रशासनाने डोळेझाक केल्याने नाईलाजास्तव पाटबंधारे विभागाला शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याची धडक कारवाई करावी लागली. 


47 लाखाचा केला भरणा
मनपा प्रशासनाने थक बाकी असलेल्या रकमेपैकी 47 लाख रुपयाचा भरणा धनादेशाच्या माध्यामातून (ता.10) पाटबंधारे विभागाकडे केला आहे. तरी देखील शहराला पाणी पुरवठा बंद होण्याची नामुस्कीला मनपा प्रशासनाला सामोरे जावे लागले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT