विदर्भ

वेळेवर वेतन करा; अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : पुसद येथील गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला होत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे आत्मदहन करण्याची परवानगी एका कर्मचाऱ्‍याने मागितली आहे. थेट मुख्यमंत्री यांच्याकडे शिक्षकदिनी रविवारी (ता. पाच) आपले सरकार पोर्टलद्वारा ऑनलाइन तक्रार केल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विधान परिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांचे मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित व समाजकल्याण कार्यालय यवतमाळ यांचे अधिनस्त पुसद येथे गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन थकीत राहत आहे. दरमहा सोडाच, पण तीन-तीन महिने वेतन होत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्‍यांनी अनेक बँकांकडून कर्ज काढले.

वेळेत वेतन मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संस्थेतील लिपिक सुरेश उत्तमराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे. जाधव यांच्या दोन मुली व मुलगा शिक्षण घेत असून फी न भरल्यास शिक्षणापासून वंचित राहावे लागेल तसेच एक मुलगी नागपूर विद्यापीठाअंतर्गत शिकत आहे.

अनेक दिवसांपासून फी भरण्यास महाविद्यालय तगादा लावत आहे. वेतन मिळत नसल्याचे मी मुलामुलींची समजूत काढण्याचे प्रयत्न करून असफल झाल्याने व आर्थिक विवंचनेत असल्याने माझे संतुलन बिघडल्याने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे दरमहा वेतन करा; अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्या, असे म्हटले आहे.

जाधव यांनी तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. वेतन नियमित नसल्याने कर्मचारी बिकट परिस्थितीत आहेत. कर्मचाऱ्‍यांनी एकत्र येऊन सामाजिक व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे त्यांचे वेतन दरमहा नियमित होणे आवश्यक आहे.
- श्रीहरी सानप, प्राचार्य, गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Criticism : राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’ तर मुन्ना महाडिकांनी बोलण्याचं तारतम्य ठेवावं, सतेज पाटलांनी महापालिका निवडणुकीत टीकेचा रंग भरला...

पाच सामन्यांत चौथे शतक, तरीही Devdutt Padikkal ला भारताच्या वन डे संघात नाही स्थान; गंभीरचं राजकारण की आणखी काही?

Latest Marathi News Live Update : केडीएमसीत ‘लोकशाही दिन’ तात्पुरता स्थगित

विकेट पडली! अर्ज मागे घेण्यावरून वाद, मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर भाजप कार्यकर्ते नाचले; उमेदवारासह १५ जणांवर गुन्हा

Sangli Election : लोकसभेच्या विजयाची जादू कायम; सांगली महापालिका निवडणुकीत ‘लिफाफा’ चिन्हाला प्रचंड मागणी

SCROLL FOR NEXT