amlanala dam need to develop as a tourist spot in chandrapur 
विदर्भ

अमलनाला धरण अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत; पर्यटकांची गैरसोय

दिपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर):  जिल्ह्यातील राजुरा, जिवती आणि कोरपना या तीन तालुक्यातील डोंगराळ भागात अमलनाला धरण आहे. या धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. केवळ जिल्ह्यातीलच नाहीतर तेलंगाणा राज्यातील पर्यटक देखील याठिकाणी गर्दी करतात. मात्र, या परिसराचा अजूनही पर्यटन स्थळ म्हणून विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

यंदा मुसळधार पाऊस पडल्याने धरण तुडुंब भरले आहे. या धरणातील पाणी वेस्ट वेअरमधून बाहेर पडत असते. त्याठिकाणी पर्यटक गर्दी करतात. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी एकदा आलेला पर्यटक परत या जागी येतोच. धरणातून पडणाऱ्या पाण्याचा धबधब्यासारखा आनंद येथील पर्यटक घेत असतात. मात्र, भिजल्यानंतर महिलांना कपडे बदलण्याची सुविधा देखील याठिकाणी नाही. त्यांना कपडे बदलण्यासाठी झाडाझुडपांचा आधार घ्यावा लागतो.

अमलनाला धरणाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. कच्चा रस्ता आहे. मात्र, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर चिखल तयार होते. त्यामधून वाहने चालवणे देखील अवघड होते. त्यामुळेच याठिकाणी अनेकांचे अपघात होतात. तसेच पर्यटक सोबत आणलेले खाद्यपदार्थ तिथेच टाकतात. त्यामुळे याठिकाणी प्लास्टिक, पेपर, बाटल्या यांसारख्या कचऱ्याचा ढिग साचलाय. त्यासाठी कचरा कुंड्यांची गरज आहे. मात्र, विकासाअभावी ते देखील याठिकाणी दिसून येत नाही.

परिसरातील पर्यटन स्थळे -

माणिकगढ किल्ला -
गोंड राजाच्या राजवटीपासून अस्तित्वात असलेला माणिकगढ किल्ला आजही याठिकाणी अगदी दिमाखात उभा आहे. हे गडचांदूर शहराचे प्रतीकच आहे. माणिकगढ किल्ल्याच्या जीवंत भिंती, तोफा, विहिरी हे सर्व काही आजही याठिकाणी पाहायला मिळते.

विष्णू मंदिर -
पुरातन काळातील एकाच दगडावर कोरलेले विष्णू मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. माणिकगढ सिमेंटच्या पायथ्याशी हे मंदिर असून दर्शनासाठी दररोज अनेक भाविकांची रांग लागलेली असता. चारही बाजूने हिरवीगार चादर ओढलेल्या विष्णू मंदिरात एकदा प्रवेश केला की बाहेर निघायची इच्छा होत नाही.  

शिव मंदिर -
गडचांदूर येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. याठिकाणी नवस बोलल्यास पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमी भाविकांची गर्दी असते. तसेच शिवमंदिर उंचावर असल्याने अमलनाला धरणाचे सौंदर्य टेकडीवरून अतिशय सुंदर दिसते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : रेशनवर मिळालेले खराब धान्य शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवले

SCROLL FOR NEXT