Amravati cylinder took the fire 
विदर्भ

अचानक सिलेंडरने पेट घेतल्याने शिरजगावात खळबळ; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

प्रतीक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील तुरकाने यांच्या घरी घरगुती कार्यक्रम सुरू होता. अचानक घरी असलेल्या सिलेंडरने पेट घेऊन आग पकडली. त्यामुळे सिलेंडर विझवण्यासाठी उपस्थित नागरिकांनी धावपळ केली. मात्र, अचानक पेट घेतलेल्या सिलेंडरमुळे काही वेळ चांगली तारांबळ उडाली होती.

गावातील तुरकाने यांच्या घरी तेरवीचा कार्यक्रम असल्याने स्वयंपाक करण्यासाठी लावलेल्या गॅस सिलेंडरने पेट घेतला. त्यामुळे सर्वांची सिलेंडर विझवण्यासाठी पळापळ सुरू झाली. उपस्थित नागरिकांनी यावेळी सतर्कता बाळगत पाणी व ओले कापडे सिलेंडरवर टाकले. मात्र, तरीही आग विझत नसल्याने पंचशील मंडळाच्या तरुणांनी व गावातील मंडळीनी जीव धोक्यात घालून गॅस सिलेंडर उचलून जवळील विहिरीत टाकला. त्यामुळे होणारी जीवितहाणी टळली.

सिलेंडर पेटत असल्याची माहिती तिवसा नगरपंचायतला मिळताच तातडीने मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तिवसा न. प.चे कर्मचारी सूरज शापामोहन, सचिन देशमुख, निखिल वानखडे यांनी विहिरीतील सिलेंडर बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उपस्थित नागरिकांनी पेटत असलेल्या सिलेंडरवर नियंत्रण केले होते.

आतील वाईसार नसल्याने पेट घेतल्याची माहिती

शुक्रवारी सकाळी गॅस एजन्सीकडून सिलेंडर घरी आणताच स्वयंपाकासाठी लावण्यात आले. मात्र, अचानक पेट घेतल्याने सर्वांनी जीव मुठीत घेत धावपळ सुरू केली. तिवसा नगरपंचायतचे अग्निशामक वाहन दाखल होताच विहिरीतून सिलेंडर बाहेर काढले तेव्हा त्याला वाईसार नसल्याची बाब समोर आली. यामुळे गॅस एजन्सीकडून लापरवाही झाल्याचे तुरकाने यांनी म्हटले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav-Raj Thackeray Meet: महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय खळबळ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे भेट, काय आहे राजकीय अर्थ?

Latest Marathi News Updates : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची आर्थिक मदत पूर्ण

Asia Cup 2025: शुभमन गिलला नेट बॉलरने त्रिफळाचीत केले, अभिषेक शर्माने २५ Six ठोकले; संजू सॅमसनला मिळेल का संधी?

Yavatmal News: सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून परिचरिकेला मारहाण, घटनेचा CCTV Viral | Sakal News

Mount Kilimanjaro Summit : आफ्रिकेतील सर्वोच्च पर्वत शिखर माऊंट किलिमांजारो इचलकरंजीच्या डॉक्टरांनी केले सर

SCROLL FOR NEXT