amravati grampanchayat election result update 
विदर्भ

Gram Panchayat Result : अमरावतीतील सुरवाडी ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय

नरेश इंगळे

शेंदूरजनाबाजार (जि. अमरावती) : राज्य पणन महासंघाच्या संचालिका छाया दंडाळे यांना तिवसा तालुक्यातील सुरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस प्रदीप राऊत व अतुल गवड यांच्या गटाच्या ग्रामविकास पॅनेलने  सातपैकी सातही जागा जिंकून दंडाळे गटाकडून ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली. 

जिल्हा व राज्यपातळीवर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या छाया दंडाळे यांच्या ग्रामसुधार पॅनेलला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. दंडाळे यांनी आपल्या कन्येला वॉर्ड एकमधून उभे केल्याने ही लढत अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, त्यांच्या कन्या रुचिका दंडाळे यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले. रुचिका दंडाळे यांना राऊत -गवड गटाच्या ललिता प्रमोद बोराळकर यांनी एकतर्फी लढाईत पराभूत केले. विजयी उमेदवारांमध्ये वॉर्ड क्रमांक एकमधून छाया संजय ताथोडे, ललिता प्रमोद बोराळकर, गजानन सुधाकर निकाळजे, वॉर्ड तीनमधून गणेश हरिदास भोमबे, आरती योगेश कोह रवींद्र वामनराव इंगळे, शीतल नरेश नागपुरे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT