amravati talent
amravati talent 
विदर्भ

Video : अमरावतीचे हे महाशय चक्क करतात उलटी गिनती... एकदा बघाच

सुधीर भारती

अमरावती : कोणाकडे काय वैशिष्ट्यपूर्ण गुण असेल; काही सांगता येत नाही. गणिताशी तर बहुतेकांचे वाकडेच असते. आणि पाढे म्हटले की अनेकांची तर पाचावर धारण बसते. सार्मान्यपणे बे एके बे, बे दुणे चार अशाच चढत्या क्रमाचे पाढे शाळेत शिकविले जातात. मात्र शिक्षकांच्याच भीतीने एका व्यक्तीने चक्क उलटे पाढे पाठ करून ही अनोखी कला अवगत केली. प्रवीण पुंड असे त्यांचे नाव असून केवळ अडीच मिनिटांत २० ते १ पर्यंतचे पाढे जलदगतीने उलटे म्हणून दाखवितात. उलटे पाढे म्हणणारे प्रवीण पुंड सध्या चांदूररेल्वे तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. 

चांदूररेल्वे येथील रहिवासी तसेच अमरावती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपीक असलेले प्रवीण पंजाबराव पुंड यांना पाचवीपासूनच उलटे पाढे म्हणण्याचा जणू छंदच लागला. सामान्यपणे बे एके बे, बे दुणे चार असेच पाढे आपल्या शैक्षणिक नियोजनात शिकविण्यात येतात, मात्र प्रवीण पुंड याला अपवाद ठरलेत. याबाबत प्रवीण पुंड सांगतात, पाचवीमध्ये असताना त्यांना गणिताच्या शिक्षकांची फार भीती वाटायची. सरळ पाढे पाठ होत नसल्याने अनेकदा त्यांना गुरुजींनी प्रसादसुद्धा दिला.

काही केल्या पाढे पाठच होत नसल्याने गुरुजींसमोर उभे राहण्याती भीती वाटायची, मात्र त्याचवेळी लक्षात आले की पाढे उलट्या क्रमाने पाठ होत आहेत. मग मात्र उलट्या क्रमानेच पाढ्यांचे पाठांतर सुरू झाले आणि कुणालाही अवगत नव्हती अशी एक नवीन कला अवगत झाल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे पाचवीपासून ते बारावीपर्यंत उलट्या पाढ्यांनीच आपली नाव किनाऱ्यावर लागल्याचे पुंड आवर्जुन सांगतात.

गणितसुद्धा अशाच पद्धतीने सोडविले. शाळेत शिक्षक आणि वर्गमित्रांसाठी हा फार कुतुहलाचा विषय होता. २० ते १ पर्यंतचे पाढे केवळ अडीच मिनिटांत न अडखडता ते गतीने म्हणतात. कुठेही चूक होत नाही. सामन्यपणे काही लोक उलटे आकडे मोजण्यात  वाकबगार असतात, मात्र उलट्या क्रमाने पाढे म्हणण्याची आपली कला एकमेव असल्याचा दावा प्रवीण पुंड करतात.

लिम्काआपल्याला बुक आँफ रेकॉर्डसाठी तयारी
मुखोद्गत असलेले पाढे न थांबता अडीच मिनिटांत आपण म्हणून दाखवतो. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी तयारी सुरू असून त्यासाठीची प्रक्रिया आपण पूर्ण करीत असल्याचे प्रवीण पुंड यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT