File photo
File photo 
विदर्भ

प्रश्‍न निकाली; तिढा मात्र कायम

राज इंगळे

अचलपूर : संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी भागात कार्यरत भरारी पथकातील डॉक्‍टरांच्या वेतनाचा मुद्दा निकाली निघालेला असला, तरी तब्बल तीन वर्षांपासूनचा तिढा कायम आहे.
1993 मध्ये मेळघाटातील कुपोषण जगासमोर आले, तेव्हापासून आरोग्य विभाग विविध योजना राबवून कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्याच्या प्रयत्नात आहे; मात्र भरारी पथकातील डॉक्‍टरांबाबत आरोग्य विभाग उदासीन आहे. सर्वप्रथम कुपोषण उजेडात आल्यावर त्यावर मात करण्यासाठी नवसंजीवनी योजनाअंतर्गत भरारी पथकात डॉक्‍टरांची नियुक्ती केली गेली. मेळघाटच्या 22 भरारी पथकांतील डॉक्‍टरांसह संपूर्ण महाराष्ट्रात 172 डॉक्‍टर नियुक्त करण्यात आले, त्यात 108 पदांची वाढ करण्यात आल्याने आता 280 डॉक्‍टर कार्यरत आहेत. तथापि त्यांच्या मूळ वेतनात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही.
सर्वप्रथम 4 हजार रुपये वेतन होते, आता ते 6 हजार आहे. 2015 मध्ये आदिवासी विभागाने भरारी पथकाच्या डॉक्‍टरांच्या वेतनाचा भार उचलण्यास तयार असल्याचे आरोग्य विभागाला कळविले होते; परंतु हा विभाग आजही निर्णय घेण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप भरारी पथकातील डॉक्‍टरांचा आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये 24 हजारांवरील वेतन 30 हजार रुपये करण्यात आल्याचे तत्कालीन संचालक सतीश पवार यांनी सांगितले होते. मेळघाटची आरोग्यसेवा भरारी पथकाच्या भरवशावर आहे. कमी वेतन आणि सुविधा नसताना हे डॉक्‍टर दिवसरात्र काम करीत आहेत. तरीसुद्धा या डॉक्‍टरांच्या वेतन व स्थायीची समस्या सोडविण्यास आरोग्य विभाग चालढकल करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT