robotic trolley 
विदर्भ

काय म्हणता..! अमरावतीत आता रोबोट करणार कोरोनाग्रस्तांची सेवा? किती छान... 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या संशयित कोरोनाबाधितांना अन्न व औषधी सेवा पुरविण्यासाठी "कोविड सेवक' या रोबोटिक ट्रॉलीचा उपयोग केला जाणार आहे. मराठी विज्ञान परिषदेने ही रोबोटिक ट्रॉली विकसित केलेली आहे. 

तीन फूट उंच आणि दोन फूट रुंद असलेल्या रोबोटिक ट्रॉलीमधून एकाच वेळी 14 ते 16 व्यक्तींचे जेवण अथवा औषधी त्यांच्यापर्यंत पोहोचविता येऊ शकते. शिवाय त्यांच्या उष्टान्नाच्या कागदी व प्लॅस्टिकच्या प्लेट अथवा थाळ्या ट्रॉलीच्या मागील बाजूस बास्केटमध्ये जमा करण्याची व्यवस्था आहे. कोरोना विषाणूची लागण ही संसर्गातून होते. त्यासाठी दोन व्यक्तींमधील संपर्क टाळण्यासाठी रुग्णालयात ही रोबोटिक ट्रॉली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

मोबाईलद्वारे होणार ऑपरेट 

या रोबोटिक ट्रॉलीचे मोबाईल ऍपद्वारे प्रोग्रामिंग करण्यात आलेले आहे. मोबाईलद्वारे ऑपरेटर ही ट्रॉली मागे-पुढे, डावीकडे उजवीकडे नेऊ शकतो. त्यामुळे ऑपरेटरचासुद्धा ट्रॉलीशी थेट संबंध येणार नाही. या रोबोटिक ट्रॉलीमध्ये रिचार्ज होणारी बॅटरी असून ती सलग एक तास चालते आणि दोन तासांत रिचार्ज होते. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण विधळे आणि सदस्य ममेश माथनकर यांच्या पुढाकारातून दिनेश सावरकर यांनी या रोबोटिक ट्रॉलीचे बॉडी स्ट्रक्‍चर तयार केले आहे. मोबाईल ऍपचे प्रोग्रामिंग देवेंद्र पांडे यांनी केल्याचे तसेच रोबोटिक ट्रॉलीला भविष्यात कॅमेरा लावला जाणार असल्याचे प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी या ट्रॉलीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी नुकतीच केली. रोबोटिक ट्रॉलीचा वापर सुरुवातीला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केला जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Deglur NCP leadership change: देगलूर राष्ट्रवादीत खांदेपालट; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व नारायण पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची बढती

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

SCROLL FOR NEXT