farmer sucide esakal
विदर्भ

Amravati : जामडोल येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

युवा शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : तालुक्यातील जामडोल येथील एका युवा शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कर्जापाई विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान काल रात्री त्याचा उपचारा दरम्यान अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला ही घटना आज सोमवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली.निखिल गोवर्धन तट्टे वय 27असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे.

यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीच्या मोठा फटका बसला असून सोगनीला आलेले सोयाबीन सुद्धा पाण्याने खराब झाले आहे, खरीप हंगामातील पीक हातून गेल्याने आता शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करायची कशी हा मोठा प्रश्न उभा झाला आहे, अशाच चिंतेतून अमरावती तालुक्यातील जामडोल येथील निखिल गोवर्धन तट्टे या युवा शेतकऱ्यांने 15 ऑक्टोंबर रोजी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान निखिलवर अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना काल रात्री उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

वडिलांच्या नावे बावीस एकर शेती मात्र वडिल अपंग व आजारी राहत असल्याने शेतीची सर्वी कामे निखिलकडे असायची मागील वर्षीच निखिलने शेतीवर कर्जा घेत टॅक्टर घेतला त्यात इतरही कर्जाचे ओझे,यावर्षी चांगले पीक होईल अश्या आशेने निखिलने शेती केली मात्र निसर्गाने होत्याच नव्हतं करून टाकलं, शेतीचे नुकसान पाहता शेती ला लावलेला पैसा,आता कर्जाची परतफेड करायची कशी अश्या विचाराने निखिलने थेट जीवन संपविण्याचा निर्णय घेत शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Pune Crime: पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव? नऱ्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् तोतया पत्रकार जाळ्यात, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

Latest Marathi News Update : दिल्लीला जाणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रिया

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

SCROLL FOR NEXT