arrested 
विदर्भ

...अन्‌ नवविवाहितेने लगावली छेड काढणाऱ्याच्या श्रीमुखात 

संतोष तापकिरे

अमरावती : एक 27 वर्षीय नवविवाहिता आपल्या घरात असताना एका आरोपी युवकाने तिच्या घरात जाऊन तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे संतापलेल्या नवविवाहितेने छेडखानी करणाऱ्या त्या भामट्याच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे चिडून त्या आरोपीने नवविवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. 

संबंधित नवविवाहित महिला आपल्या घरात घरकामात व्यस्त होती. त्याचवेळी आरोपी शीलघन इंगोले (वय 32) हा तिच्या घरात शिरून महिलेशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने शीलघनच्या श्रीमुखात लगावून स्वतःची सुटका करून घेतली.

त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती सासू-साऱ्यांना दिली. पीडितेने श्रीमुखात हाणल्याने आरोपी शीलघन चिडला. त्याने त्या नवविवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिली. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, अशा शब्दात तिला धमकावून पळ काढला. नांदगावखंडेश्‍वर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शीलघन इंगोले (वय 32) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शनिवारी रात्री अटक केली. रविवारी (ता. 12) त्याला पोलिसांनी विशेष न्यायालयापुढे उभे केले होते, असे पोलिस निरीक्षक उदय सोईतकर यांनी सांगितले. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT