Anger burns fathers house son takes poison Chandrapur district news 
विदर्भ

घरगुती कारणावरून बाप-लेकात वाद झाला; रागात वडिलांचे घर जाळून मुलाने घेतले विष

सकाळ डिजिटल टीम

कोरपना (जि. चंद्रपूर) : घरगुती कारणावरून बाप-लेकात वाद झाला. वाद टोकाला जाऊन मुलाने आपल्याच घरात आग लावली. आगीत घर जळून खाक झाले. त्यानंतर मुलाने उंदराला मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्याला गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती आता धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गडचांदूरपासूनच काही अंतरावर आसन खुर्द गाव आहे. इंजापूर येथे मारोती पेंदोर (वय ६०), पत्नी व मुलगा रामा पेंदोर (३५) आणि सून नातवंडं असा परिवार वास्तव्यास आहे. मारोती पेंदोर यांची शेती आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचे घर चालते. मात्र, मुलगा मारोती पैशासाठी आई-वडिलांना नेहमीच त्रास द्यायचा. पैशाच्या कारणातून बाप-लेकात नेहमीच वाद व्हायचे. मुलाच्या भांडणामुळे आई वडील त्रस्त झाले होते.

शेवटी आई-वडिलांनी इंजापूर येथील घर व शेती मुलाला दिली. ते आसन येथे आले. तिथे जागा घेऊन छोटेसे घर उभारले. मोलमजुरी करून जीवनाचा गाडा मारोती हाकत असताना आसन खुर्द येथे येऊन रामाने आई-वडिलांना त्रास देणे सुरू केले होते. या त्रासाला कंटाळून मारोतीने दोन दिवसांपूर्वी गडचांदूर पोलिस स्टेशन गाठले. ठाणेदार गोपाल भारती यांना आपली आपबिती सांगितली.

घरचे प्रकरण घरीच शांत करावे या हेतूने मुलाला बोलाविले. त्याला समज दिली. मुलगा रामाही मानला. मात्र, रामाच्या डोक्‍यात वडिलांविषयी भलतेच सुरू होते. शनिवारी सकाळी आई-वडील इंजापूर होते. तेव्हाच रामाने आसन येथील वडिलांचे घरच पेटवून दिले. यात मारोतीचे घर जळून खाक झाले. आगीत जवळपास एक लाखांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस पाटलाने अग्निशमन दलास माहिती दिली.

गडचांदूर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब आले. त्यांनी आग आटोक्‍यात आणली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गोपाल भारती हे घटनास्थळी दाखल झाले. मुलावर त्यांनी गुन्हा दाखल केला. रामा पसार झाल्याने त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. गावाच्या काही अंतरावर रामाच्या हातात कुऱ्हाड, तर दुसऱ्या हातात उंदराला मारण्याचे औषध होते.

पोलिस दिसताच त्याने औषध खाल्ले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात भरती केले. सध्या त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT