anil deshmukh get angry due to late rice crop selling in gondia 
विदर्भ

ऑनलाइन बैठकीत का संतापले अनिल देशमुख?

अतुल मेहेरे

नागपूर : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी करण्यासाठी उशिर होत आहे. त्यामुळे पालकमंत्री अनिल देशमुख चांगलेच संतापले. दिवाळी संपली तरी अद्याप धान खरेदी सुरू का करण्यात आली नाही, याचा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २५ नोव्हेबरपर्यंत सर्व धान खरेदी केंद्र सुरू करा. तसेच २८ नोव्हेंबरला मी स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत गोंदिया येथे येऊन किती खरेदी झाली याचा आढावा घेणार असल्याचे सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्ह्यातील धान खरेदीचा आढावा ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरटे, जिल्हाधिकारी दिपककुमार मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, जिल्हा पणन अधिकारी भारत भूषण पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, अतुल नेरकर, राजू जैन यावेळी उपस्थित होते. 28 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी पणन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात 70 धान खरेदी केंद्रांना व आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रात 44 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. 

असे असताना 22 नोव्हेंबरपर्यंत पणन अधिकाऱ्यांनी 41 केंद्रांवर 21 हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने 3 केंद्रावर 2 हजार क्विंटल धान खरेदी केले. यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदीविना पडून असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू करावी, असे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे नवीन केंद्रांना मंजुरी द्यावयाची झाल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT