Animals also face the sorrow like Human 
विदर्भ

Exclusive : वाघीण व सिंहीणीबद्दल ही माहिती वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

मिलिंद उमरे

गडचिरोली : मानवी जीवनात पुरातन काळापासूनच महिलांच्या आयुष्यात संघर्ष, वेदना व दुःख आहेत. म्हणूनच "स्त्री जन्मा ही तुझी कहाणी नयनी अश्रू ओठी गाणी' असे म्हटले जाते. परंतु, हे केवळ मानवी जीवनाबद्दल लागू होते असे नाही. एकूणच पशुपक्ष्यांमध्येही बहुतांश हाच प्रकार पहायला मिळतो. 

वाघ व वाघीण

आपण वाघ किंवा सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो. म्हणजे त्यांच्या माद्या अर्थात वाघीण आणि सिंहीण यांना राणीसारखे आयुष्य मिळायला हवे. पण, प्रत्यक्षात होत काय की, वाघ व वाघीण जेव्हा संसाराला सुरुवात करतात तेव्हा वाघोबा फक्त मिलनाचे काही दिवस वाघिणीसोबत राहतात. मानवी भाषेत बोलायचे झाल्यास फक्त मधुचंद्र साजरा करण्यापुरते. पुढे गर्भारपण, बाळंतपण, छाव्यांचे संरक्षण, संगोपन ही सगळी कामे वाघिणीच्याच वाट्याला येतात. आपल्या बाळांना शिकार शिकवण्यापासून त्यांना यात पारंगत करण्यापर्यंत जवळपास दोन वर्षे तिला खर्ची घालावी लागतात.

सिंह आणि सिंहिणी

सिंहांच्या कुटुंबातही काही वेगळे नाही. सिंह अर्थात जंगलाचा राजा वाघाप्रमाणे एकटा राहत नाही. त्याचा सगळा कुटुंबकबिला सोबत असतो. त्यात त्याच्या अनेक राण्या असतात. म्हणजे सवत हा प्रकार सिंहिणीच्या पाचवीलाच पुजलेला असतो. सिंह समूहाने शिकार करीत असले तरी नर शिकारीत फारसा भाग घेत नाही. तो झोपा काढणच पसंत करतो. मग शिकारीची जबाबदारी सिंहिणीवर येते. ती अतिशय मेहनतीने शिकार करते. पण, शिकार होताच त्यावर ताव मारायला सिंहोबा हजर होतात. त्याने खाल्ल्यावर छावे खातात आणि मग कुठे सिंहिणी खातात. 

सुगरण किंवा बया पक्षी

पक्ष्यांच्या विश्‍वातही असेच प्रकार घडतात. सुगरण किंवा बया पक्षी तुम्हाला माहीतच आहे. तो छान घरटं विणून मादीला पटवतो. तसा तो मादीने घरटं पसंत करेपर्यंत पूर्ण बांधत नाही. फक्त वरचा हेल्मेटसारखा भाग बांधतो. तिने पसंत केल्यावर खालचा नळीसारखा भाग पूर्ण करतो. मादी आतली सजावट करते. पण, एकदा मिलन होऊन मादीने अंडे दिले की हा पठ्ठा तिच्याशी चक्क काडीमोडच घेतो. तो नवीन मादी मिळवण्यासाठी नवे घरटे विणण्यात गर्क होतो. पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या मिसेस सुगरणवर येऊन पडतात. गंमत म्हणजे एक नर एका हंगामात अशी पाच घरटी विणू शकतो. म्हणजे पाच बायका मिळवू शकतो. 

धनेश पक्षी

आपल्या अनोख्या दुहेरी चोचीमुळे आकर्षक दिसणारा धनेश पक्षी तर मोठच दिव्य पार पाडतो. जेव्हा नर, मादीच मिलन होते तेव्हा ते झाडाची ढोली शोधतात. त्या ढोलीत मादी धनेश बसते. मग नर चिखल मातीने त्या ढोलीला बंद करणे सुरू करतो. मादीही आतून त्याला मदत करते. फक्त मादीची चोच बाहेर निघू शकेल एवढी फट ठेवतात. त्यानंतर ढोलीत बंदिस्त मादी तिथेच अंडी घालून ती उबवते. पुढे पिल्लं मोठी होईपर्यंत तिला या कैदखाण्यात राहावे लागते. नर बाहेरून फळ व इतर खाद्य तिला पुरवतो. या काळात तिचे पंखही गळून जातात. फक्त आपल्या लेकरांना शिकारी प्राणी, पक्ष्यांपासून धोका होऊ नये म्हणून ती स्वेच्छेने हा तुरुंगवास स्वीकारते. 

विंचू

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. विंचवाची मादी म्हणजे विंचवी पिल्लांना जन्म दिल्यावर त्यांना आपल्या पाठीवर सांभाळते. मानवी विश्‍वात ज्याप्रमाणे बाई आपल्या पोटात बाळाला सांभाळते तसेच विंचवी पाठीवर आपल्या पिल्लांना सांभाळते. यात मिस्टर विंचू काहीच मदत करत नाहीत. एकूणच इथेही प्रचंड संघर्ष आहेच. 

सारेच असे नसतात बरं..

पशू, पक्ष्यांच्या विश्‍वातील स्त्री दुःख बघताना अगदीच निराश व्हायची गरज नाही. कारण, इथेही अनेक सुखद गोष्टी आहेत. हत्ती, चितळ या प्राण्यांमध्ये नेतृत्वाचा मान मादीला मिळतो. नेतृत्व करणारी हत्तीण ज्या दिशेला जाईल तिकडे सगळा कळप जातो. चितळांची नेता असलेली मादी धावताना ज्या दिशेला कान वळवते त्या दिशेने तिचा कळप वळतो. सारस क्रौंच, स्वर्गनाचण, नवरंग अशा अनेक पक्ष्यांचे नर आपल्या मादीसोबत सगळी जबाबदारी उचलतात. आळीपाळीने अंडी उबवतात. पिल्लांचे संगोपन करतात. 

जीवघेणे मिलन...

कोणत्याही नर मादीसाठी मिलन ही सुखद अनुभूती असते. पण, विडो स्पायडर या कोळी प्रजातीच्या नरासाठी मिलन हे साक्षात मृत्यूला आमंत्रण असते. कारण, नरापेक्षा आकाराने बरीच मोठी असलेली मादी मिलन होताच त्याला मारून खाऊन टाकते आणि स्वतःच वैधव्य पत्करते. म्हणजे तिला इंग्रजीत विडो स्पायडर म्हणतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यथा राजा, तथा प्रजा! खरात प्रकरणी सुषमा अंधारे मुख्यमंत्री फडणवीसांवर घसरल्या, शपथविधीला...

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सचा भारी विक्रम... ठरली जगातील पहिली फ्रँचायझी; पाकिस्तानचा विक्रम आता संकटात

Pune Murder Case: भेटायला बोलावलं, कात्रज बोगद्याजवळ नेत २५ वर्षीय मनिषाला संपवलं; आरोपीला अटक

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सच्या Playing XI मध्ये तिघांचे पदार्पण! जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स... सूर्यकुमार यादव ११ मधून बाहेर

महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार! ४ एप्रिलपर्यंत हवामान विभागानं दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT