rupees 
विदर्भ

नकली नोटा चलनात आणण्याच्या होते तयारीत अन् झाले जेरबंद

शाहीद कुरेशी

मोताळा (जि.बुलडाणा) : दोन लाख 92 हजारांच्या बनावट नोटांसह दोघांना बोराखेडी पोलिसांनी शिताफीने पकडले. सदर कारवाई सोमवारी (ता.20) पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सविस्तर असे की, बोराखेडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पीएसआय अशोक रोकडे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.20) पहाटे 2 वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली. दरम्यान, राजेंद्र सदाशिव बोरले (55, रा. जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (45, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे जण दोन दुचाकीवर मलकापूरकडून मोताळ्याकडे येताना दिसून आले. 

दोन लाख 92 हजाराच्या नकली नोटा जप्त
पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. दरम्यान, संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता, दोघांच्या खिशातून भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या 146 बनावट नोटा (दर्शनी किंमत 2 लाख 92 हजार रुपये), पाचशे रुपयांच्या पाच नोटा (किंमत 2500 रुपये), दोन दुचाकी (किंमत 40 हजार रुपये), तीन मोबाईल (किंमत 7 हजार रुपये) असा एकूण 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींनी भारतीय चलनातील नकली नोटा उपयोग करण्यासाठी ताब्यात ठेवल्या होत्या. 

बोराखेडी पोलिसांनी केली अटक
बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, सोमवारी (ता.20) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बोराखेडी पोलिस ठाणे गाठून आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री जंजाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT