Amravati 
विदर्भ

आपल्या मागण्यांसाठी आशासेविका जिल्हाधिकारी कक्षाचा ताबा घेतात तेव्हा! 

कृष्णा लोखंडे

अमरावती ः मानधन वाढवून देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेल्या आशा वर्कर यांनी गुरुवारी (ता. आठ) जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या मांडून कक्षाचा ताबा घेतला. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पाच आशांना कक्षात बसू देण्यास परवानगी देत इतरांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांनी कक्षासमोर खुल्या जागेत उपोषणाला सुरुवात केली. 

सकाळी ११ वाजता आशावर्कर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला गेले होते. त्यांच्या कक्षात कुणीच नव्हते. गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आशांसोबत चर्चेला कुणीच अधिकारी न आल्याने त्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाचाच ताबा घेतला. कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत आशांना कक्षातून बाहेर काढले. पाच आशा वर्कर्सना बसू देण्याची परवानगी दिली. त्या जिल्हाधिकारी येईस्तोवर ठाण मांडून होत्या. 

काही वेळाने त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या शासनाला कळवितो, असे उत्तर दिल्याने समाधान झाले नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्यात आले. केवळ एक हजार रुपये प्रती महिना मानधनावर काम करणाऱ्या आशासेविकांनी मानधन वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. अंगणवाडी सेविकांप्रमाणे ९ हजार रुपये नियमित मानधन देण्यात यावे, त्याशिवाय कोरोना महामारीच्या काळात ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा, आयुष्यमान आणि इंद्रधनुष्य योजनेचे पैसे तत्काळ खात्यात जमा करण्यात यावे या मागण्यांसाठी आशा सेविका उपोषणाला बसल्या आहेत.

पाच आशा वर्करची प्रकृती खालावली

गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या पाच आशा वर्कर्सची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये संगीता वानखडे, अंजना ढोके, नंदा मेश्राम, वंदना मोहोड व अक्षा तबस्सूम यांचा समावेश आहे. शहरातील २५२ पैकी १८० आशा वर्कर आंदोलनात सहभागी झाल्या असून त्यांनी पूर्णतः कामबंद केल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेवर परिणाम होऊ लागला आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT