Assembly adjourned until tomorrow 
विदर्भ

#NagpurWinterSession : विधानसभा उद्यापर्यंत स्थगित (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मागणी करीत विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांनी आजही पुन्हा एकदा बॅनर झळकावले. हे बॅनर सत्ताधारी पक्षातील आमदाराने हिसकाविण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. हा गोंधळ लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ध्या तासासाठी कामकाज थांबवले. कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी दोन्ही बाकांवर बसलेल्या सदस्यांना समज दिली. मात्र, यानंतरही विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केल्याने अध्यक्षांनी विधानसभा दिवसभारासाठी तहकूब केली. 

शेतकऱ्यांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये कमी तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार मदत मिळत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका देवेद्र फडणवीस यांनी घेतली. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केली. आमदार अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर काढून पुन्हा झळकावण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी त्यांना "जागेवर बसा, बॅनर फडकवू नका' असे आवाहन केले. 

याचदरम्यान सत्तापक्षाकडून आमदार संजय रायमूलकर यांनी समोर येत अभिमन्यू पवार यांच्या हातातील बॅनर हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील आमदार समोरासमोर येऊन एकमेकांना धक्काबुक्की केली. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशीष शेलार, शिवसेनेचे भास्कर जाधव, रवींद्र वायकर यांनी मध्यस्ती केली.

यानंतरही सभागृहात वेळमध्ये विरोधीपक्षाच्या आमदारांनी येऊन घोषणाबाजी सुरू ठेवल्याने अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. यानंतर कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना समज दिली. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळण्याची मागणी करीत विरोधकांनी घोषणबाजी करीत गोंधळ कायम ठेवला. या गोंधळादरम्यान चार विधेयक मंजूर करण्यात आली. यानंतर अध्यक्षांनी सभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित केले. 

सेना-भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की, अध्यक्षांनी दिली समज

सावरकरांच्या मुद्यावरून विरोधकांनी पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. यावेळी गोंधळादरम्यान विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सावरकरांचे बॅनर झळकावले होते. दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी करीत परिसरात आंदोलन करीत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम 57 अन्वये सूचना देत चर्चेची मागणी केली. वाढता गोंधळ लक्षात घेता विधानसभा अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी सभा तहकूब केली. कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी दोन्ही बाकांवर बसलेल्या सदस्यांना समज दिली. यानंतरही विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT