babita
babita 
विदर्भ

Video : करोडपती बबिताताईंच्या स्वप्नाला जिद्दीचे पंख! करताहेत एमपीएससीची तयारी

श्याम कळमकर :

भंडारज, (जि. अमरावती)  : आज लॉकडाऊनचा २८ वा दिवस. जगभरात कोरोनाने घातलेल्या  थैमानाने संपूर्ण जग घरात बसले आहे. थोर, लहान, गरीब, श्रीमंत, करोडपती सा-यांनाच कोरोनाने घरात बंदीस्त केले आहे. अशातच अंजनगावसुर्जी तालुक्यातील करोडपती बबिता ताडे सध्या काय करीत आहेत याची उत्सुकता आहे.
एकीकडे जगातील सर्व व्यवहार थांबले असताना काही मंडळींनी याप्रसंगी घरात राहून स्वत:चे छंद जोपासले आहेत. १९ सप्टेंबर  २०१९ ला महानायक अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात करोडपती होण्याचा सन्मान प्राप्त करणा-या बबिता सुभाष ताडे सध्या एमपीएसची तयारी करीत आहेत.
करोडपती झाल्यापासून जनता कर्फ्यू जाहीर होईपर्यंत सत्कार-समारंभाच्या कार्यक्रमांनी बबिता ताडे यांना व्यस्त करून टाकले होते. परंतु लॉकडाउनमध्ये व्यस्ततेला पूर्णविराम मिळाला. या काळात बबिताताई घरकामासोबत आपला सर्वाधिक आवडता छंद जोपासत आहेत. तो म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी.
शासकीय आदेशानुसार शालेय पोषण आहारातील शिल्लक धान्याचे वाटप पालकांना त्यांनी शाळेत जाऊन केले. कोरोनाच्या या अत्यंत कठीणप्रसंगी  शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बबिताताईंनी देशवासीयांना केले.
त्यांची दिनचर्या अगदीच साधी आहे. स्वयंपाक, चहा-पाणी, नाश्ता तसेच घरातील सर्व कामे करण्यासोबतच त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खास वेळ देतात. ज्या पद्धतीने करोडपती होण्याचे लक्ष्य साध्य केले तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमाने अधिकारी होण्याचे स्वप्नसुद्धा साकारण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येते. पती तसेच मुलांकडून मिळणारी साथसुद्धा महत्त्वाची ठरल्याचे त्या सांगतात.

बबिता ताडे यांचे पती सुभाष ताडे हे पंचफुलाबाई हरणे विद्यालयात कार्यरत आहेत. त्यांची मुलगी पल्लवी ही सध्या पुण्यात शिक्षण घेत असून मुलगा मोहितने दहावीची परीक्षा दिली आहे. बबिता ताडे यांचे माहेर चिखलदरा येथे आहे. सर्वसामान्य कुटंबातील बबिता ताडे यांनी आपल्या नियमित अभ्यासाच्या जोरावर कौन बनेगा करोडपती या मालिकेत एक करोड रुपये जिंकून अमरावती जिल्ह्यात विक्रम प्रस्थापित केला. प्रशासनाच्या विविध उपक्रमांत त्यांचे सातत्याने सहकार्य असून अंजनगावसुर्जीच्या पंचफुलाबाई हरणे विद्यालयात विद्यार्थ्याना शालेय पोषण आहार शिजविणे तसेच वाटप करण्याचे काम करणा-या बबिता ताडे आज करोडपती असल्या तरी त्यांच्या साधेपणात कोणतेच परिवर्तन झालेले नाही. आजसुद्धा त्या शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत आहेत. आता शाळा बंद असल्याने तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेतून तांदूळ वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी त्या आज शाळेत गेल्या होत्या. आजवर तीन ते चार वेळा त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा दिल्या असून एमएचा अभ्याससुद्धा त्या करीत आहेत.

वेळेचा सदूपयोग करा
कोरोनामुळे सध्या सर्वजण लॉकडाऊन आहेत. या वेळेचा सदूपयोग केल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा सर्वांना होईल. मीसुद्धा वेळ काढून अभ्यास करीत आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेण्यासोबतच वेळेचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन बबिता ताडे यांनी सकाळशी बोलताना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT