file photo
file photo 
विदर्भ

पवनारचा ऐतिहासिक दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत...परिसराचे करावे सौंदर्यीकरण

रूपेश खैरी

वर्धा : पवनार येथील दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होईल. म्हणूनच या प्राचीन दिल्ली दरवाजाचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व निर्देशानुसार संरक्षित करण्यात यावी, या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करून परिसराचेही सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनद्वारे करण्यात आली आहे.

वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेले पवनार हे गाव प्राचीन संस्कृती व ऐतिहासिक वारसा यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. द्वितीय प्रवरसेन राजाची राजधानी असलेले प्रवरपूर हे आज पवनार या नावाने ओळखले जाते. या गावाचा उल्लेख ‘आईना ए अकबरी’ या ग्रंथात पनार या नावाने आढळतो. या गावात झालेल्या खोदकामात प्राचीन मूर्त्या अजूनही सापडतात, असे पवनारवासींनी सांगितले.

‘बहार’च्या अभ्यासकांची भेट

कधीकाळी या गावाला चहुबाजूने परकोट असल्याने त्याचेही अवशेष येथे आढळून येतात. या परकोटाला असलेल्या चार दरवाजांपैकी केवळ एक दरवाजा शिल्लक असून तो दिल्ली दरवाजा या नावाने ओळखला जातो. या ऐतिहासिक वारस्याचा मागोवा घेण्यासाठी नुकतीच बहारच्या अभ्यासकांनी या गावाला भेट दिली. या भेटीत दिल्ली दरवाजाची दुरवस्था झाली असून एक बाजू अत्यंत नाजूक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

दरवाजाजवळ गुरे बांधली जातात

दरवाजावर वेली तसेच अवतीभवती झुडपे वाढलेली आहेत. शिवाय, मानवी हस्तक्षेपामुळे दरवाजाला लागूनच बांधलेली गुरे व शेणखताचा मोठा ढीग दिसून आला. या दरवाजावर एक शिलालेख असून तो कधीही निखळून पडू शकतो, अशी अवस्था झाली आहे. याची वेळीच दखल घेतली नाही तर या शिलालेखासह एक ऐतिहासिक दस्तावेज नष्ट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अन्य वास्तूंमध्ये वापरल्या गेलेले कोरीव दगडही गावात सर्वत्र अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आले आहेत.

छोटेखानी वस्तुसंग्रहालय उभारावे

बहारच्या सदस्यांनी ग्रामवासींशी संवाद साधला असता गतवैभवाची साक्ष देणाऱ्या या वास्तूचे जतन व्हावे, ही भावना त्यांच्यातही दिसून आली. या प्राचीन ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासोबतच दरवाजाच्या भोवतालचा परिसरही संरक्षित करावा, दरवाजासमोरील मोकळ्या जागेत उद्यान निर्माण करावे. शेजारीच संशोधनाच्या दृष्टीने एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय उभारून ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेल्या प्राचीन मूर्त्या व अवशेषांचे संकलन करावे, अशी मागणी पवनारभेटीत सहभागी झालेले बहारचे सदस्य संजय इंगळे तिगावकर, प्राचीन वास्तू अभ्यासक आर्किटेक्‍ट निखिल अवथनकर जैन, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, दीपक गुढेकर, जयंत सबाने, राहुल वकारे, अनिल देवतळे, देवाशीष साळवे व पार्थ वीरखडे यांनी केली आहे.

शासनाला निवेदन देणार

या भेटीत स्थानिक नागरिक सुधाकर महाराज, शेख बब्बू व रमेश पलटनकर यांनी सहकार्य केले. या संदर्भात शासनाला निवेदन व प्रस्ताव देणार असल्याची माहिती बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष आर्कि. रवींद्र पाटील, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, वैभव देशमुख, स्नेहल कुबडे यांनी दिली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT