For bank elections Personal meetings are going on for president post in Yavatmal  
विदर्भ

जिल्हा बँक निवडणूक: अध्यक्षपदासाठी संचालकांशी होताहेत 'वन टू वन' चर्चा

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांच्या निवडीसाठी रविवारी (ता. तीन) महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षांच्या नावावर एकमत होणार आहे. त्यामुळे नेत्यांच्या बैठकीच्या आधी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना नेते आपापल्या संचालकांचे मत जाणून घेणार आहेत. त्यासाठी संचालकांशी "वन टू वन' चर्चा केली जाणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांची निवड सोमवारी (ता. चार) होणार आहे. त्यासाठी दुपारी एकला बॅंकेच्या सभागृहात बैठक होईल. यापूर्वीच अध्यक्षपदावर आपली वर्णी लावण्यासाठी संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बॅंकेवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. 21पैकी 16 संचालक आघाडीचे आहेत. असे असले तरी अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अजूनही एका नावावर एकमत झालेले नाही. 

सर्वच संचालकांकडून अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या कॉंग्रेसमध्ये आहे. बॅंकेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यावेळीही कॉंग्रेसचा अध्यक्ष राहावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडूनही अध्यक्षपदाची चाचपणी केली जात आहे. बॅंकेच्या राजकारणात पुसद येथील शब्द आजपर्यंत पाळला गेला. त्यामुळे तिथून आलेले नावावर एकमत होत आले आहे. यावेळी महाविकास आघाडीची सत्ता आली असल्याने अध्यक्षपदावरून एका गटाला एक नाव, तर दुसऱ्या गटाला दुसरे नाव चालत नाही. 

परिणामी, पेच वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. या राजकारणातून वेगळे परिणाम समोर येण्याची भीती आहे. त्यामुळेच अध्यक्ष निवडताना संचालकांना विश्‍वासात घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी रविवारी (ता. तीन) आघाडीच्या बैठकीआधी संचालकांशी नेते संवाद साधणार आहेत. संचालकांशी चर्चा करून त्यांच्या मनात कोणते नाव आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. निवडणुकीची वेळ आल्यास संचालकांनाच मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे आधीच संचालकांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल.

नॉनस्टॉप संपर्क

महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदाची लॉटरी कोणत्याही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यापैकी कुणालाही लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले संचालक नॉनस्टॉप संचालक नेत्यांच्या संपर्कात आहेत. गाठीभेटी घेऊन त्यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गाठीभेटीचे "वजन' कुणाच्या पारड्यात पडणार, हे रविवारीच (ता.तीन) निश्‍चित होणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT