bank give only 23 percentage crop loan to farmers in yavatmal  
विदर्भ

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांचा आखडता हात, रब्बी हंगामासाठी आतापर्यंत फक्त २३ टक्के कर्जवाटप

चेतन देशमुख

यवतमाळ : यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 67 कोटी 48 लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील आतापर्यंत केवळ 1 हजार 200 शेतकऱ्यांना 15 कोटी 25 लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून रब्बीसाठी पीककर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी आखडता हात घेतल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

या वर्षातील रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेमार्फत तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार रब्बी हंगामात जिल्ह्यातील नऊ हजार 255 शेतकऱ्यांना 67 कोटी 48 लाख रुपयांच्या कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही म्हणावी तशी गती पीककर्ज वाटपाला आलेली दिसत नाही. यंदा खरीप हंगामापासून अनेक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. सोयाबीन पीक हातातून गेल्यानंतर कापसावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, बोंडअळीने कापसाचे उत्पादन घटलेले आहे. अशातच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचा आधार होता. मात्र, कर्जवाटप होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आतापर्यंत एक हजार 164 शेतकऱ्यांना केवळ 15 कोटी 25 लाख रुपयांचे पीककर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रब्बी हंगामामधील पीककर्जाचे वाटप वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

बँकनिहाय खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट -

बँक शेतकरी रक्कम (कोटीमध्ये)
व्यावसायिक बँका 6,226 45 कोटी 46 लाख
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2,261 16 कोटी 95 लाख
ग्रामीण बँक 768 पाच कोटी सात लाख

राष्ट्रीयीकृत बँकांवर 'वॉच' -

पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची टक्‍केवारी कमी असते. कर्जवाटपाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी नियमित आढावा घेतला. त्यामुळेच यंदा खरीप हंगामात पीककर्ज वाटप हे 72 टक्‍क्‍यांवर गेलेले आहे. त्यानंतर आता रब्बी हंगामात याच पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करून राष्ट्रीयीकृत बँकांवर वॉच ठेवणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : महिला IPS प्रकरणात रोहित पवारांनी अजितदादांची बाजू घेतली की टोमणा मारला? नेमकं काय म्हणाले?

Korean Kimchi: आंबट तिखट अन् खमंग चवीचं कोबीचं लोणचं म्हणजेच कोरियन किमची नक्की आहे तरी काय?

कुत्र्यामुळे मोडला संसार! बॉलिवूड अभिनेत्याच्या लग्न मोडण्याचं कारण ठरला कुत्रा, नक्की काय झालेलं...

Nashik News : मविप्र विद्यापीठाबाबत गैरसमज कशासाठी? संस्थेचे थेट स्पष्टीकरण!

Shivraj Bangar On Laxman Hake: 'ज्या गावच्या बोरी त्याचं गावच्या बाभळी असतात' | Sakal News

SCROLL FOR NEXT