couple 
विदर्भ

मुलींनो, बाॅयफ्रेंडसोबत जाताना सावध राहा.... पडू शकते महागात

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : शाळा, महाविद्यालयांना बुट्टी मारून मित्रांसोबत निर्जनस्थळी जाण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. अशा ठिकाणी गेल्यानंतर टवाळखोर तरुणांकडून मुलींची छेड काढली जाते. इतकेच नव्हे, तर मुलांसोबतचा व्हीडीओ बनवून ब्लॅकमेलिंग केली जाते आणि मग नको ती मागणी पूर्ण करून मुलींना बेअब्रू व्हावे लागते.

घाटंजी तालुक्‍यातील चोरकुंडच्या जंगलात घडलेल्या घटनेपासून सगळ्यांनीच बोध घेणे गरजेचे आहे. प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम आटोपून दोन मित्रांच्या दुचाकीवर बसून शाळकरी विद्यार्थिनी चोरकुंडच्या धरणावर गेली होती. मित्रांसोबत फिरत असताना अनोळखी दोन तरुण तिथे आले. व्हीडीओ बनविण्याची धमकी देत दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून रूपेश राठोड (वय 31) व संतोष जाधव (वय 26, दोघेही रा. चोरकुंड) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करीत अटक करण्यात आली.


अत्याचाराच्या घटनांनी खळबळ
न्यायालयापुढे हजर केले असता, बुधवारपर्यंत (ता.29) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हा प्रकार चव्हाट्यावर आल्याने वाच्यता झाली. मात्र, बदनामीच्या भीतीने मुली पोलिसांत तक्रार करीत आहेत, हेदेखील वास्तव असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

- करोनाच्या धाकाने आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग सोपे
प्रेमात आंधळ्या झालेल्या महाविद्यालयीन व शाळकरी मुली बेधुंद होत मित्राच्या दुचाकीने निर्जनस्थळी पोहोचतात. टवाळखोर मुलांना या स्थळाची माहिती असल्याने त्यांच्या घिरट्या सातत्याने सुरूच राहतात. मग नको त्या अवस्थेतील जोडपे दिसल्यास व्हीडीओ शूटिंग करून मुलींना बदनामी करण्याची धमकी दिली जाते आणि आपली मागणी पूर्ण करून घेतली जाते. शिवाय पैसेही हिसकावून घेत असल्याचे बोलले जाते. बदनामीच्या भीतीने अत्याचार होऊनदेखील "ब्र." काढला जात नाही. निर्जनस्थळी घडणाऱ्या घटना पालकांसह पाल्यांसाठी चिंताजनक आहेत.

दुचाकीवरही अश्‍लील चाळे
यवतमाळ शहरातील आर्णी बायपास, भोयर बायपासवर प्रेमीयुगुलांची वर्दळ दिवसभर बघावयास मिळते. दुचाकीवर बसून चालणारे अश्‍लील चाळे बघून ये-जा करणाऱ्या नागरिकांची मान शरमेने खाली जाते. या परिसरात लुटमार करून बेअब्रू करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. चौसाळा जंगल, बोरगाव डॅम येथेही जाणाऱ्या प्रेमी युगुलांची संख्या कमी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT