Accident News Esakal
विदर्भ

Accident News: गाढ झोपेत असतानाच मजुरांवर काळाचा घाला; ट्रकने दहा मजुरांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी

अपघाताची बातमी: Ten laborers were crushed by a truck...

अंकिता खाणे (Ankita Khane)

बुलढाण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवारी) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली आहे.

दरम्यान संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मजुरांना उपचारासाठी तातडीने मलकापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पसार झाला. पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.

हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून महामार्गावर कामासाठी आलेले होते. पहाटे साडे पाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातात प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी तीन मृतांची नावे आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे.

पुलावरील कामासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथून कामगार आले होते. रविवारी दिवसभर काम केल्यानंतर मजूर रस्त्याच्या कडेला टीनशेडमध्ये झोपलेले होते. कामगार गाढ झोपेत असतानाच आज (सोमवारी) पहाटे साडेपाच वाजण्याच्या भरधाव ट्रक थेट टीनशेडमध्ये घुसला. यामध्ये ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालकाचे  गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची  पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT