Big Brother murder from younger brother due to TV
Big Brother murder from younger brother due to TV 
विदर्भ

टीव्ही का बंद केला म्हणून लहान भावाने चढवला मोठ्यावर हल्ला आणि... 

रवींद्र शिंदे

यवतमाळ : टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियावर सतत गुंग असलेली आजची पिढी बरीच खुनशी आणि रागीट झाली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे हीच बाब अधोरेखित होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उघडकीस येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पालकही चिंतित आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही बंद का केला, असा जाब विचारत लहान भावाने मोठ्यावर वासल्याने (छोटी कुऱ्हाड) हल्ला चढवीत त्याचा खून केला. ही घटना कळंब तालुक्‍यातील पिंपळशेंडा येथे आज रविवारी (ता.26) पहाटे दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, गेल्या चार दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्याने कळंब तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या खुनातील संशयित विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

असा घडला प्रकार... 

पिंपळशेडा येथे एका कुटुंबात वडील, दोन भाऊ वास्तव्यास आहेत. आज रविवारी दोघे भाऊ रात्री एक वाजेपर्यंत खाटेवर झोपून टीव्ही पाहत होते. रात्री दीडच्या दरम्यान मोठा भाऊ झोपला, असे समजून लहान भावाने टीव्ही बंद केला. टीव्ही का बंद केला, म्हणून मोठ्याने लहान भावाला मारहाण केली व त्याला मारण्यासाठी वासला आणला. लहान्याने वासला त्याच्या हातातून हिसकावून घेतला व भावाच्या मानेवर जोरदार वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दोघेही सावत्रभाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास 

सकाळी सहाला पोलिस निरीक्षक विजय राठोड, सहायक पोलिस निरीक्षक राजेश साळवे यांनी घटनास्थळ गाठून संशयिताला ताब्यात घेतले. तो विधिसंघर्षग्रस्त बालक असण्याची शक्‍यता असल्याने त्याचा शाळेचा दाखला (टीसी) मागविण्यात आली आहे. परंतु, शाळा बंद असल्यामुळे मिळू शकली नाही. रविवारी (ता.26) उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश साळवे करीत असून, पोलिस सर्वच बाजूंनी तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT