birds from europe and america migrated in yavatmal 
विदर्भ

युरोप, अमेरिकेतील पक्ष्यांचे यवतमाळात स्थलांतर; विदेशातील १०४ प्रजातींची नोंद

चेतन देशमुख

यवतमाळ : बदलत्या ऋतूप्रमाणे चारा, पाण्याच्या शोधात जगभरातील पक्षी सातत्याने स्थलांतर करतात. स्थलांतर करणारे हे पक्षी केवळ दुसऱ्या राज्यातच नव्हे तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशातही जातात. आपल्या जिल्ह्यातही युरोप, अमेरिका यासह जगातील विविध देशांमधून स्थलांतरित पक्षी आल्याची नोंद आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने विदेशातून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या विविध 104 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद वनविभागाकडे आहे.

जगभरात पक्ष्यांची जैवविविधता झपाट्याने कमी होत आहे. अनेक पक्षी प्रजाती तर दूर्मीळ श्रेणीत समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन व्हावे आणि सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या संरक्षणाची गरज काय? याची माहिती पोहोचावी, यासाठी पहिल्यांदाच पाच ते 12 नोव्हेंबर 2020 दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षी निरीक्षणादरम्यान जिल्ह्यात जगातील विविध देशांमधून देखील पक्षी स्थलांतर करून येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांची नोंद पक्षीमित्र आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या पक्षीअभ्यासकांनुसार तब्बल 104 विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यातील जंगल परिसर आणि जलाशये जसे धरण, तलाव या ठिकाणी त्यांचे वास्तव्य राहते. साधारणत: ऑक्‍टोबर ते एप्रिल या कालावधीत हे स्थलांतरित पक्षी जिल्ह्यात येतात. याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात विविध 200 पेक्षा अधिक प्रजातींच्या स्थानिक पक्ष्यांची नोंददेखील करण्यात आली आहे. यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी यांची नोंद करण्यात आली आहे. या माध्यमातून वनविभागाकडे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पक्ष्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कार्यक्रम तयार केला जाणार आहे. 

पक्ष्यांची मानवी जीवनातील असलेली महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. केवळ पक्षी सप्ताहापुरता हे उपक्रम न राबवता वर्षभर सातत्याने पक्षीसंवर्धन आणि संरक्षण यासाठी कार्यक्रम राबविण्यात येतील. पक्ष्यांच्या संरक्षणासाठी वन विभागासोबतच सर्वसामान्य नागरिकांनीही पुढाकार घेऊन पक्ष्यांची आवासस्थाने संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.
-केशव वाबळे, उपवनसंरक्षक, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT