BJP agitation in front of Tukadoji Maharaj Samadhi at Gurukunj Mozari 
विदर्भ

 'दार उघड उद्धवा दार उघड'च्या घोषणांनी दुमदुमला गुरुकुंज आश्रम परिसर  

प्रतीक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : राज्यात अनलॉक पाच होऊनही  मंदिर बंदच असल्याने ते आता सुरू व्हावे यासाठी भाजपकडून राज्यभरातील प्रमुख मंदिरांसमोर आज आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर मंगळवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले यावेळी दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

राज्यांतील सर्व मंदिरे सुरू करावी  ही मागणी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी हिंदुत्ववादी संघटनांनी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली आहे. राज्यात अनलॉक पाचमध्ये मंदिर उघडण्याचा निर्णय झाला नसल्याने भाजप आक्रमक झाली आहे. गुरुकुंज मोझरी येथेही तुकडोजी महाराज यांच्या समाधी समोर भाजप,विश्व हिंदू परिषद आदींनी आंदोलन केले. 

मंदिर बंद असल्यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे . ज्या भूमीमध्ये आज आम्ही आंदोलन करत आहे ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा जगभरात ग्रामगीतेच्या माध्यमातून पोहोचलेला आहे.

मंदिरे उघडे असते तर आज तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली देण्यासाठी देश-विदेशातून लाखो गुरुदेव भक्त आले असते. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे राष्ट्रसंतांच्या भूमीत नीरव शांतता पसरलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राज्यभरातील सर्व मंदिरे उघडी करावी, अशी मागणी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे (चौधरी) यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice-President Election : देशाचे १७ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज मतदान; NDAचे राधाकृष्णन अन् INDIA चे रेड्डी यांच्यात लढत

Sachin Tendulkar : BCCIच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर अनुत्सुक? महत्त्वाची अपडेट समोर...नेमकं काय घडतंय?

'Gen Z'समोर झुकलं नेपाळ सरकार, २० मृत्यू अन् गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर बंदी हटवली

Minister Jayakumar Gore: ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेतली

Paneer Moong Dal Appe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पनीर मुग डाळ अप्पे, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT