file photo
file photo 
विदर्भ

आरमोरीच्या जागेसाठी भाजप-सेनेत चढाओढ; आमदार कृष्णा गजबेंच्या अडचणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होणे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा केला असून ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली भाजपची एक जागा कमी होण्याची शक्‍यता आहे. युतीमुळे आमदार कृष्णा गजबे यांच्या अडचणीत भर पडली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली होती. यात भाजपचे कृष्णा गजबे विजयी झाले. मागील पाच वर्षांच्या काळात आमदार गजबे यांनी आपले अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून अनेक विकासाची कामे केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून मताधिक्‍य मिळाले होते. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याने ही जागा शिवसेनेच्या कोट्यात जाणार आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान उमेदवार कृष्णा गजबे यांची पंचाईत होण्याची शक्‍यता आहे.
या क्षेत्रात शिवसेनेची ताकद पूर्वीप्रमाणे नसल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राची जागा गमावण्यापेक्षा भाजपला देण्यात यावी, यासाठी भाजप नेते आतापासून वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या संपर्कात आहेत.
आमदार गजबे यांच्या जनसंपर्क व मनमिळावू स्वभावामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रात ते लोकप्रिय झाले. आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो, असा तर्क लावला जात आहे. शिवसेनेबद्दल नाराजी असल्याने युतीच्या वाट्याची ही जागा भाजपलाच द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील काही निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करून युतीची जागा कोणाला द्यायची, याचाही विचार पक्षश्रेष्ठींपुढे मांडला जाणार आहे.
शिवसेनेला अवकळा
एकेकाळी आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा दबदबा होता. माजी जिल्हा प्रमुख हरीश मने, सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केलेल्या परिश्रमामुळे अन्य पक्षाला येथे स्थान मिळाले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत अंतर्गत वाद, कार्यकर्त्यांत समन्वयाचा अभाव तसेच पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याने सेनेला उतरती कळा लागली आहे. या तुलनेत भाजपने या मतदारसंघात आपला प्रभाव दाखवत दोन्ही नगर परिषदेवर कब्जा केला. त्यामुळे युती झाली असली; तरी शिवसेनेला सरळ हाताने हा मतदारसंघ मिळणार नाही, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT