accident.jpg 
विदर्भ

वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बांधला दोरखंड, मात्र हे नियोजन पिता-पुत्रावर... 

सकाळ वृत्तसेवा

कारंजा (जि.वाशीम) : प्रशासनाने दुपारी दोन वाजेपर्यंत शिथिलता दिल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक लगबग करीत असून, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून, दोरखंड बांधण्यात आले आहे. मात्र, हे दोरखंडच अपघातास कारणीभूत ठरून पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता.7) दुपारच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील ग्राम पलाना येथील पिता-पुत्र दुचाकीने (एमएच 37, आर 9510) कारंजाहून कटलरीचा माल घेउन घरी जात होते. मात्र, मार्गातील कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याजवळ वाहतूक वळविण्यासाठी पोलिसांनी दोरखंड बांधला. या दोरखंडाला दुचाकी अडकल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात पिता -पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना 108 रुग्णवाहिकेने जखमींना उपचाराकरिता कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

बिसमिल्ला खॉ नजीर खॉ (वय35) व अरबाज बिसमिल्ला खान (वय 12) असे जखमी बापलेकाचे नाव आहे. या अपघातातील वडिलांच्या गळ्याला जबरदस्त इजा झाली. तर, मुलाचा डोळा निकामी झाला. कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. दरम्यान, घटनेच्या पोलिसातील नोंदीबाबत अधिक तपशिल प्राप्त होऊ शकला नाही.

खाकीची माणुसकी
हा अपघात घडल्यानंतर तेथे हजर असलेल्या गणेश जाधव या पोलिस कर्मचार्‍याने जखमींना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. यामध्ये त्यांनी स्वतःच्या दुचाकीवर दवाखान्यात नेल्याने या कर्मचार्‍याचे कपडे रक्ताने माखले होते. तसेच ठाणेदार पाटील यांनीही रुग्ण वाहिकेसाठी धावपळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT