file photo 
विदर्भ

ब्रेकिंग...मुंबईवरून आलेल्या कोरोनाग्रस्ताचा यवतमाळात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : दिग्रस तालुक्‍यातील कोरोबाधित एक व्यक्ती रुग्णवाहिकेने यवतमाळकडे येत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 30) सायंकाळी घडली. त्यामुळे रुग्णवाहिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आली. याठिकाणी पोहोचल्यानंतर काही वेळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात रुग्णवाहिका उभी होती.

भीतीमुळे रुग्णवाहिकेजवळ जाणे टाळळे

कोरोनाच्या भीतीमुळे तसेच मुंबई येथून रुग्णवाहिका आल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेजवळ जाण्याचे टाळले होते. त्यामुळे काही वेळापूर्वी कागदोपत्री कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे. ही व्यक्ती मुंबईतील रुग्णालयात भरती असताना त्याला यवतमाळात रुग्णवाहिकेने येण्याची परवानगी कशी मिळाली, याची चर्चा सुरू होती.


अहवाल आला पॉझिटिव्ह

मात्र त्याचा अहवाल यवतमाळात पोहोचताच पॉझिटिव्ह आल्याचे मुंबईवरून कळविण्यात आले. त्याला मुंबईत व्हेंटिलेटर न मिळाल्याने यवतमाळला आणले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु मुंबई ते यवतमाळ हजारो किलोमीटरचा प्रवास व अनेक जिल्हे ओलांडून ही व्यक्ती यवतमाळपर्यंत कशी पोहोचली, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

प्रशासनाने पाळली गुप्तता

प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. सर्व प्रक्रिया पार पडल्यावर कळविले जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

Stock Market : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात, सेन्सेक्सने ओलांडला 81,430 चा टप्पा, निफ्टीतही मोठी वाढ

"दुसऱ्याचं घर फोडलं...!" स्मिता पाटीलच्या आईचा राज बब्बरसोबतच्या लग्नाला होता तीव्र विरोध! म्हणाल्या... 'तु तर होमब्रेकर...'

Hyderabad Gazette : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करा: मिथुन राठोड यांची मागणी; १७ सप्टेंबरला सोलापुरात मोर्चा

SCROLL FOR NEXT