bridge on navegaonbandh Gothangaon road collapsed complete suspension of traffic including ST buses sakal
विदर्भ

Gondia : नवेगावबांध गोठणगाव मार्गावरील पूल खचला; एसटी बसगाड्यासह संपूर्ण वाहतूक बंद

नवेगावबांध-गोठणगाव या मुख्य मार्गावरील तलावाजवळील पूल गुरुवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास खचला. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसेससह संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून अनेक गावांचा संपर्कही तुटला

सकाळ वृत्तसेवा

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील नवेगावबांध-गोठणगाव या मुख्य मार्गावरील तलावाजवळील पूल गुरुवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास खचला. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसेससह संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. या मार्गाची वाहतूक नवेगावबांध-कवठा-कालीमातीवरून गोठणगावकडे वळविण्यात आली आहे.

नवेगावबांधवरून गोठणगाव-केशोरीमार्गे गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील गोठणगाव तलावाजवळ हा पूल आहे. गुरुवारी रात्री हा पूल पूर्णतः कोसळला. सुदैवाने एका चारचाकी वाहनातील दोन ते तीन जणांचा जीव वाचला.

या मार्गावरून परिसरातील शेकडो गावातील नागरिक नवेगावबांध बाजारपेठ तसेच गोंदिया जिल्ह्याशी शासकीय तथा खासगी कामासाठी संपर्क साधतात. या मार्गावर वाहनाची मोठी वर्दळ असते. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण मंजूर होऊनही रस्ता बांधकामात वनविभागाने आडकाठी धोरण घेतल्यामुळे प्रलंबित आहे.

लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन जनतेला दिले. मात्र, ते आश्वासन हवेतच विरले. परिणामी, अशा घटना आणि त्या घटनांमध्ये लोकांचा जीव गेल्यानंतर शासन रस्ता बांधकामाला परवानगी देणार काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या मार्गावर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व गोठणगाव येथील इटियाडोह धरण तसेच प्रतापगड येथील तीर्थस्थळावर जाणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. धार्मिक आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावर वाहतूक सुरू असते.

साकोली आगाराची बस नवेगावबांधमार्गे गोठणगाव-केशोरी अशी धावते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थिनींना बस उपलब्ध होणे कठीण झाले असून, नागरिकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान, प्रवाशांनी नवेगावबांध-कवठा-कालीमाती- गोठणगाव या मार्गे प्रवास करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी केले आहे.

पर्यायी रस्ता पुन्हा गेला वाहून

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी-चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचे मागील तीन महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे. यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पर्यायी रस्ता आतापर्यंत तीनदा वाहून गेला आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह विद्यार्थी व ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT