brownsugar
brownsugar 
विदर्भ

नागपुरातून 30 लाखांची ब्राऊन शुगर जप्त, एनडीपीएसची कारवाई 

अनिल कांबळे

नागपूर : मुंबईतून उपराजधानीत तस्कर करण्यात येत असलेली 30 लाख रूपये किंमतीची ब्राऊन शुगर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीसी) केली. पोलिसांनी महिलेसह दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई एनडीपीएसचे प्रमुख राजेंद्र निकम यांनी केली. 

मुंबईतून नागपुरात दोघे जण 30 लाखांची ब्राऊन शुगरची तस्करी होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली. त्यांनी आज सायंकाळी कळमना-कामठीरोडवरील स्वामी विवेकानंद नगरात सापळा रचला. दरम्यान एक महिला आणि युवक हातात बॅग घेऊन गल्लीतून जात होते. पोलिसांना दिसताच त्यांनी झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले. रेवन सिताराम ढोबळे (वय 26, रा. तेलीपुरा, शांतीनगर) आणि चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर (वय 55, इतवारी रेल्वे स्टेशन) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून 561 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 490 ग्रॅम अन्य गर्द पावडर जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राऊन शुगरची किंमती जवळपास 30 लाखांपर्यंत आहे. 

तस्करांना मोठा हादरा 
30 लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केल्यामुळे मुंबई आणि नागपुरातील ड्रग्स तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वीसुद्धा राजेंद्र निकम यांनी 25 लाखांचा ड्रग्स जप्त केला होता. एनडीपीएसच्या पथकाचा दरारा उपराजधानीत कायम असल्यामुळे तस्करांनी नागपुरकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT