A burnt body was found in the forest of Amravati 
विदर्भ

जंगलात जनावरे चराईसाठी गेला आणि समोरचे दृष्य पाहून सरकली पायाखालची जमीन

संतोष ताकपिरे

अमरावती : चांगापूर ते वलगाव मार्गावर जंगलात एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. बुधवारी (ता. तीन) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह अंदाजे ३१ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा असून, उंची अंदाजे सहा फूट आहे. हत्या की, आत्महत्या यासंदर्भात संभ्रम कायम आहे. ही घटना चोवीस तासांपूर्वीची असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. मंगळवारी (ता. दोन) रात्री ही घटना घडली असावी.

तीन तारखेला सकाळी परिसरात जनावरे चराईसाठी जाणाऱ्या व्यक्तीला जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसला. जंगलात ज्याठिकाणी मृतदेह आढळला त्याच्या आसपासचे बरेच चौरस फूट जंगलालासुद्धा आग लागून बरेच नुकसान झाल्याचे दिसून आले. एकतर दुसरीकडे मारहाण करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वलगाव ते चांगापूर मार्गावरील जंगलात जाळला असावा.

गाडगेनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली. मागील काही दिवसांपासून आयुक्तालयाच्या हद्दीत या वयाचा कुणीही पुरुष बेपत्ता नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटावी म्हणून घटनास्थळी आसपासच्या गावातील काही ग्रामस्थांना बोलविण्यात आले होते. परंतु त्यातही ठोस निष्कर्ष निघू शकला नाही.

निर्जनस्थळी दारूच्या बॉटल्स
जेथे जळालेला मृतदेह आढळला. त्याच्या आसपासचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. निर्जनस्थळी दारूच्या खाली बॉटल्स आढळल्या. 
- आसाराम चोरमले,
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

शवविच्छेदनातून बऱ्याच बाबी स्पष्ट होतील
सदर व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. शवविच्छेदन अहवालातून बऱ्याच बाबी स्पष्ट होतील.
- पूजा खांडेकर,
सहायक पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT